Numerology Predction: अंकज्योतिषानुसार प्रत्येक मूलांकाचा एक ग्रहस्वामी असतो. जसा मूलांक १ चा स्वामी सूर्य आणि मूलांक ३ चा स्वामी गुरु आहे, तसाच मूलांक ४ चा स्वामी राहू मानला जातो.

ज्योतिषशास्त्रात राहू हा अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक मानला जातो. राहूच्या प्रभावामुळेच अनेकांना अचानक मोठे यश आणि प्रगती मिळते, असे मानले जाते. तुम्हाला माहिती आहे का, मूलांक ४ असलेल्या लोकांच्या आयुष्यावर राहूचा विशेष प्रभाव असतो.

राहूच्या कृपेने या लोकांचे नशीब अचानक उजळते आणि ते शून्यातून शिखरावर पोहोचतात. चला तर मग जाणून घेऊया, मूलांक ४ असलेल्या लोकांचे आयुष्य कसे असते.

ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ४ असतो. या मूलांकाचे लोक मेहनती, आत्मविश्वासू, शिस्तप्रिय आणि बुद्धिमान असतात. ते जे ठरवतात, ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत.

मूलांक ४ असलेल्या लोकांचा स्वभाव आणि आयुष्य

  • मूलांक ४ असलेले लोक नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. तयार वाटेने चालण्यापेक्षा स्वतःची वाट तयार करणे त्यांना आवडते.
  • हे लोक खूप मेहनती असतात आणि आपल्या कष्टाच्या जोरावर कोणत्याही कामात यश मिळवू शकतात.
  • यांच्या मनात जे असते ते हे स्पष्टपणे समोरच्याला सांगतात. पाठीमागे बोलणे त्यांना अजिबात आवडत नाही.
  • यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व काहीसे गूढ असते. यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे ओळखणे खूप कठीण असते.
  • हे आपले दुःख किंवा भविष्यातील योजना सहजपणे कोणासमोर व्यक्त करत नाहीत.
  • तीक्ष्ण बुद्धी आणि चांगल्या नियोजनाच्या जोरावर हे लोक आयटी, मीडिया, राजकारण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, संशोधन, वकिली आणि शेअर बाजार अशा क्षेत्रांत मोठे नाव कमावतात.
  • यांना आयुष्यात यश अचानक मिळते आणि कमी वेळातच ते मोठ्या उंचीवर पोहोचतात.
  • पैसे कमावण्याच्या बाबतीत हे नशीबवान असतात. मात्र जास्त खर्च करण्याच्या सवयीमुळे त्यांच्या हातात पैसा फार काळ टिकत नाही.
  • हे लोक धार्मिक स्वभावाचेही असतात.
  • या मूलांकाच्या महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान मानल्या जातात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)