ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र खास महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जन्मतारखेवरून त्यांच्या आयुष्याच्या काही खास गोष्टी जाणून घेता येतात. प्रत्येक व्यक्तीचा मूलांक वेगळा असतो. मूलांकावरून व्यक्तीचे विचार, वर्तन आणि करिअरबाबत अंदाज व्यक्त केला जातो. अंकशास्त्रानुसार, पालक आणि पाल्य नात्यात मूलांकाची एक विशेष भूमिका असते.

अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट मूलांकाच्या मूली आईच्या खूप लाडक्या असतात त्याचप्रमाणे काही विशिष्ट मूलांकाचे मुलं वडिलांचे खूप लाडके असतात. अंकशास्त्रानुसार अशा मूलांकाच्या मुलांबाबत जाणऊ घेऊ जे वडिलांचे अत्यंत लाडके असतात.

वडील आणि मुलगा हे नाते नारळासारखे असते. वडील बाहेरून नारळासारखे कितीही कठोर वाटत असले तरी पण प्रत्यक्षात नारळाच्या आतील मलईप्रमाणे वडीलांचे हृदय आपल्या मुलांसाठी अत्यंत कोमल असते. मुलंही अगदी वडिलांप्रमाणेच वागतात. वर वर मुलांचे वडिलांबरोबर कितीही मतभेद असले तरी त्यांचा वडिलांवर खूप जीव असतो. अंकशास्त्रानुसार या मुलांकाचे तरुणांचे वडिलांबरोबर मित्रासारखे नाते असते. या तारखेला जन्मलेले तरुणांचे वडिलांवर जीवापाड प्रेम करतात. कोणते आहेत ते मूलांक जाणून घ्या.

मूलांक ३

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म, ३,१२, २१,३० या जन्मतारेखला झाला आहे त्यांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाच्या लोकांवर गुरुचा प्रभाव असतो कारण या मूलाकाचे स्वामी देवगुरू बृहस्पति आहे. या मूलांकाच्या मुलं अत्यंत आज्ञाधारी आणि संस्कारी असतात आणि आपल्या वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकतात. आयुष्यात जास्त मेहनत करतात ज्यामुळे समाजात त्यांचे खूप कौतुक होतो. गुरूच्या प्रभावाने हे लोक मान-मर्यांदाचे पालन करतात तसेच ऐश्वर्य आणि आर्थिक स्थिरता मिळवतात.

मूलांक ६

ज्या लोकांचा जन्म महिन्यातील ६, १५, २४ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक ६ असतो. या मूलाकंचे स्वामी शुक्र आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शूक्रदेव प्रेम आणि सौंदर्य, विलासिता, भौतिक सुख-सुविधांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे या हा मूलांक ६वर शुक्रदेवाची कृपा होते.

हा मूलांक असलेल्या मूलांना वडिलांवर खूप जीव असतो आणि वडिलांची सर्व गोष्टी ऐकतात. आपल्या आई-वडिलांना आयुष्यात कशाची कमतरता होऊ देत नाही. ज्या लोकांना मूलांक ६ असतो. ते लोक घरात नेहमी आनंदी वातावरण निर्माण करतात. चांगला स्वभावामुळे ते वडिलांचे अत्यंत लाडके असतात.