Numerology Predictions By Date Of Birth : अंकशास्त्र जन्मतारखेचे विश्लेषण करून व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भविष्य आणि जीवनातील विविध पैलू निश्चित करता येतात. हे विशिष्ट जन्मसंख्या असलेल्या लोकांवर प्रभाव पाडणारे गुण, संधी आणि आव्हाने निश्चित करण्यास मदत करतात. काही जन्मसंख्याच्या जीवनात भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळते. अशी मंडळी पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान मानली जातात आणि नेहमीच त्या आर्थिकदृष्ट्या यशस्वी सुद्धा ठरतात. त्यांच्या भाग्यात सतत संपत्ती आणि यश असते. तर अंकशास्त्रानुसार या कोणत्या जन्मतारखा आहेत जाणून घेऊ…
मूलांक १
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक १ असतो. सूर्य हा या अंकाचा अधिपती ग्रह आहे. सूर्याप्रमाणेच हे लोक त्यांच्याभोवती प्रकाश पसरवतात आणि त्यांच्या उपस्थितीने इतर लोकांना प्रभावित करतात. यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. ही मंडळी कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात, त्यांच्या प्रयत्नांनी आणि समर्पणाने ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. पैशाच्या बाबतीत खूप हुशार, कमाई आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टींची सखोल समज असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांच्या आयुष्यात पैशांची कमरतात भासत नाही.
मूलांक १ असलेले लोक राजेशाही स्वभावाचे असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण असतात, त्यांना कोणाच्याही हाताखाली काम करायला अजिबात आवडत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेकदा त्यांना करिअरमध्ये लक्षणीय यश मिळते आणि २५ ते २६ वर्षातच ही मंडळी श्रीमंत होतात. भगवान कुबेरांचे विशेष आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच राहतात; ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असे म्हणतात.
मूलांक ५
५, १५ किंवा २३ रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या संख्येवर बुध ग्रहाचे राज्य असते; जो ज्योतिषशास्त्रात बुद्धी आणि ज्ञानाचा देव मानला जातो. ५ मूलांक असलेले लोक खूप बुद्धिमान असतात, स्वतःचे निर्णय घेण्यात पारंगत असतात. फक्त त्यांची आणि विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही मंडळी नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यशस्वी होतात. त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची समज त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. ही मंडळी जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. शेअर बाजारात किंवा व्यवसायात नफा मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांच्या आयुष्यात अनेकदा आर्थिक प्रगती आणि समृद्धी येते; ज्यामुळे ते त्यांच्या प्रयत्नांनी लवकर श्रीमंत होतात….

