Numerology Predictions: अंक ज्योतिष ही एक जुनी आणि अचूक विद्या आहे. ती सांगते की आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि नशिबावर खूप मोठा परिणाम होत असतो. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अंकांना खूप महत्त्व दिलं जातं.
असं मानलं जातं की जन्मतारखेवरून काढलेल्या मूलांकावर एखाद्या खास ग्रहाचा प्रभाव असतो. आज आपण अशा काही खास मूलांक असलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घर व्यवस्थित सांभाळण्यात तर कुशल असतातच, पण पैशांचं नियोजन करण्यातही खूप हुशार असतात.
मूलांक २ (जन्मतारीख- २, ११, २०, २९)
अंक ज्योतिषानुसार, ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक २ असतो. या अंकाचा स्वामी चंद्र आहे. चंद्राच्या प्रभावामुळे या मुली स्वभावाने शांत आणि संयमी असतात.
उगाच खर्च करण्यापासून दूर राहतात
अंक ज्योतिषानुसार, मूलांक २ असलेल्या मुली पतीची कमाई खूप विचारपूर्वक खर्च करतात. उगाच किंवा फाजील खर्च करणे त्यांना आवडत नाही. घराच्या गरजा आणि बजेट यामध्ये योग्य तो समतोल कसा ठेवायचा, हे त्यांना चांगलं माहीत असतं.
मूलांक ४ (जन्मतारीख- ४, १३, २२, ३१)
ज्या मुलींचा जन्म महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ४ असतो. अंक ज्योतिषानुसार, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे.
राहू त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आणि भविष्यासाठी योजना आखण्याची ताकद देतो. मूलांक ४ असलेल्या महिला फक्त पैसे साठवण्यातच नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवण्यातही विश्वास ठेवतात.
त्या आपल्या पतीसाठी मजबूत आर्थिक आधार बनतात. भविष्यातील सुरक्षितता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे त्या साठवलेल्या पैशातून मालमत्ता किंवा गुंतवणुकीच्या योजना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
मूलांक ६ (जन्मतारीख- ६, १५, २४ )
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक ६ असतो. या अंकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे.
शुक्र हा सुख-सुविधांचा कारक मानला जातो, पण या मूलांकाच्या मुली चैनीपेक्षा उपयोगी गोष्टींना जास्त महत्त्व देतात. त्या उगाचच्या वस्तूंवर पैसे खर्च करण्याऐवजी कामाच्या आणि उपयोगी गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. यांची खासियत म्हणजे मर्यादित बजेटमध्येही घर सुंदर आणि नीटनेटके ठेवणे. यांच्या हातात पैसा आला की घरात भरभराट वाढते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
