Numerology Predictions: चांगला जीवनसाथी किंवा लव्ह पार्टनर मिळणं ही आयुष्यातील मोठी देणगी असते. पण प्रत्येकाची या बाबतीत किस्मत चांगली असतेच असं नाही. अंकशास्त्रात (न्यूमेरोलॉजीमध्ये) काही अशा मूलांकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांचे लोक चांगले पार्टनर ठरत नाहीत.
क्रूर आणि कठोर
हे लोक ना आपल्या पार्टनरच्या भावना समजून घेतात, ना त्याची जास्त काळजी घेतात. अनेक वेळा ते खूप कठोर होतात. ते भांडण-मारामारीपर्यंत जातात आणि आयुष्य नरकासारखं करून टाकतात.
मूलांक ४ (Mulank 4)
४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. राहूच्या प्रभावामुळे हे लोक कधी कधी कठोर होतात. पार्टनरसोबत वाईट वागतात. हे रागीट आणि हट्टी स्वभावाचे असल्यामुळे पार्टनरचं अजिबात ऐकत नाहीत आणि नेहमी स्वतःच्या मनानेच वागतात.
मूलांक ८ (Mulank 8)
८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. याचा स्वामी शनी ग्रह आहे. शनीच्या प्रभावामुळे माणूस हट्टी आणि एकाच गोष्टीचा ध्यास घेणारा होतो. त्यामुळे हे लोक आपली स्वप्नं किंवा ध्येय पूर्ण करण्याच्या नादात पार्टनरलाही विसरतात आणि त्याला एकटं सोडतात.
मूलांक ९ (Mulank 9)
९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९चा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो माणसाला रागीट आणि आक्रमक बनवतो. त्यामुळे हे लोक कधी कधी हिंसक होतात आणि पार्टनरसोबत वाईट वागतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

