Numerology Predictions: न्यूमेरोलॉजीमध्ये १ ते ९ पर्यंत मूलांकाची माहिती दिली आहे. त्यांची खास गुणवैशिष्ट्ये आणि स्वभावही दिलेले आहेत. मूलांक ९ चे स्वामी ग्रह मंगळ आहेत, त्यामुळे या मूलांकाच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव जास्त असतो. कोणत्याही महिन्यात ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ मानला जातो. आज आपण मूलांक ९ असलेल्या मुलींबद्दल जाणून घेऊ. त्यांच्या स्वभावात काही खास गुण असतात, ज्यामुळे त्या यशस्वी आणि लोकप्रिय होतात.

रागावलेला आणि हट्टी स्वभाव (Mulank 9 Girls Personality)

मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक ९ असलेल्या मुलींचा स्वभाव थोडा रागीट आणि हट्टी असतो. त्यांना खूप लवकर आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येतो. त्या स्वतःवर अन्याय होऊ देत नाहीत आणि इतरांवर अन्याय होताना पाहूनही शांत बसू शकत नाहीत.

इतरांना मदत करण्यात पुढाकार घेणे

मूलांक ९ असलेल्या मुली धाडसी आणि निडर असतात. त्या नेहमी इतरांना मदत करण्यासाठी पुढे येतात. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना खूप मान-सन्मान मिळतो.

चुकीचे निर्णय

कधी-कधी त्या चुकीचे निर्णय घेतात आणि त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते. नात्यांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. या मुलींसाठी संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि तेच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरते. त्या नेतृत्व करण्यातही पुढे असतात. ज्या क्षेत्रात जातात, तिथे चांगले यश मिळवतात. त्यांना डिफेन्स, खेळ, पोलीस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात विशेष यश मिळते.

मंगळाचे उपाय 

जर मंगळामुळे त्रास होत असेल, तर मंगळवारी हनुमानजीची पूजा करा. ‘ॐ अं अंगारकाय नमः’ हा मंत्र जपा, याचा फायदा होतो. मंगळवारी गूळ-चणे दान करा. आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)