Numerology Business Mulank : अंकशास्त्रानुसार, काही लोकांच्या रक्तातच व्यावसायिक बनण्याची ताकद असते. या यादीत अशा चार मूलांकांचा समावेश आहे, जे जन्माला येतानाच काहीतरी कौशल्य घेऊनच येतात.

अंकशास्त्रानुसार (Numerology) विशिष्ट मूलांकांच्या व्यक्तींमध्ये उपजतच व्यावसायिक कौशल्य असते. हे लोक कोणाच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे जास्त पसंत करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, दूरदृष्टी व धाडस यांच्या जोरावर हे लोक व्यापारात मोठ्या प्रमाणात यश मिळवतात.

कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. या मूलांकाच्या व्यक्तींवर ग्रहांचा राजा सूर्याचा प्रभाव असतो. त्यांच्यात नेतृत्वगुण (Leadership) ठासून भरलेले असतात. हे लोक त्वरित आणि अचूक निर्णय घेण्यात पटाईत असतात. स्वतःचा स्टार्टअप, रिअल इस्टेट किंवा प्रशासनाशी संबंधित व्यवसायअशा व्यक्तींसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

मूलांक ३

३, १२, २१ किंवा ३० या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. त्यांच्यावर देवगुरू गुरू ग्रहाची विशेष कृपा असते. हे लोक अत्यंत बुद्धिमान आणि दूरदृष्टीचे असतात. त्यांची नियोजनाची बैठक एवढी पक्की असते की, त्यांना व्यवसायात तोटा होण्याची शक्यता फार कमी असते.शिक्षण, पतपुरवठा, प्रकाशन, सल्लागार सेवा, प्रशिक्षण संस्था ही क्षेत्रे या मूलांकाच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतात.

मूलांक ५

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. अंकशास्त्रात ५ हा अंक बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो बुद्धी आणि व्यापाराचा कारक मानला जातो. त्यांचे संवादकौशल्य (Communication Skills) आणि नेटवर्किंग उत्तम असते. बाजारातील नवीन ट्रेंड ते लगेच ओळखतात. ई-कॉमर्स, ट्रेडिंग, शेअर मार्केट, सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रांत हे लोक खूप नाव कमावतात.

मूलांक ६

६, १५ किंवा २४ या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या अंकावर धन आणि वैभवाचा स्वामी शुक्र ग्रहाचे आधिपत्य असते. त्यांना त्यांना रचनात्मक आणि विलासी जीवनशैलीची उत्तम समज असते. फॅशन, सौंदर्यप्रसाधन, उपाहागृह हॉटेल व्यवसाय, इंटेरियर डिझायनिंग आणि चैनीच्या वस्तूंचा व्यापार करणे त्यांच्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)