Numerology : ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांवरून १२ राशी ठरवल्या जातात. यात प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याचप्रकारे अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्माच्या तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक पाहून व्यक्तीचे भविष्य, छंद, स्वभाव यांसारख्या विविध गोष्टींचे वर्णन केले जाते.

जन्म तारखेवरून पाहा तुमचा भाग्यांक

अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीचा मूलांक पाहायचा असेल तर तो फक्त त्याच्या जन्म तारखेच्या अंकावरून कळतो. पण, जर तुम्हाला भाग्यांक पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण जन्म तारखेची बेरीज करावी लागते. उदाहरणार्थ = एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख ११ सप्टेंबर १९७५ असेल तर त्याचा भाग्यांक पाहण्यासाठी जन्म तारखेची बेरीज करावी लागेल. (११/०९/१९७५) १+१+९+१+९+७+५=३३ येईल, जेव्हा दोन अंकी संख्या येते, त्याची पुन्हा बेरीज करायची. म्हणजे ३+३ = ६ येणार, म्हणजे या व्यक्तीचा भाग्यांक ६ आहे.

Numerology Studies: Shani Blessing Birthdates
२०२ दिवस शनी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना देणार श्रीमंतीसह नाते जोडण्याची शक्ती, तुमच्या कुंडलीत आर्थिक बळ कसंय?
The persons of these four zodiac signs will get money prosperity and pleasures of wealth
६ जुलैपर्यंत शुक्राचा प्रभाव! ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, समृद्धी व ऐश्वर्याचे सुख
After 4 days godess Lakshmi bless you The golden time
४ दिवसांनंतर घरी नांदणार लक्ष्मी; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार पद-प्रतिष्ठा अन् धन-संपत्तीचे सुख
when will be rahu transit
Rahu Gochar : राहु कधी करणार राशी परिवर्तन? ‘या’ राशीला राहावे लागेल सावध
Natyarang Sai Paranjape wrote directed the play Evalese Rope
नाट्यरंग‘:इवलेसे रोप; हसतखेळत सुन्न करणारा नाट्यानुभव
The grace of Goddess Lakshmi will be on the persons of these three zodiac signs
सूर्य करणार कमाल, तुम्ही होणार मालामाल; नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Moon Astrology chandrama in kundali
Moon Astrology: मूड स्विंग्समुळे तुम्ही वैतागला आहात का? चंद्राच्या प्रभावामुळे बिघडते- सुधारते व्यक्तीचे वर्तन
Horoscope Budhaditya Rajayoga money come in your life Immense grace of Lakshmi
आता पडणार पैशांचा पाऊस! ‘बुधादित्य राजयोगा’च्या प्रभावामुळे ‘या’ तीन राशींवर लक्ष्मीची अपार कृपा

तुमच्या भाग्यांकावरून पाहा तुमचे भविष्य

भाग्यांक १

भाग्यांक १ असणाऱ्या व्यक्तींना सूर्याची कृपा प्राप्त असते. त्यामुळे त्यांना आयुष्यात जे हवं आहे त्यासाठी ते नक्कीच यश मिळवतात. त्यांचे भाग्य २२व्या आणि ३४व्या वर्षात उजळते. या वयात त्यांना जास्तीत जास्त यश मिळते.

भाग्यांक २

भाग्यांक २ असणाऱ्या व्यक्तींवर चंद्राची विशेष कृपा असते. या व्यक्ती स्वभावाने थोड्या शांत आणि भावनिक असतात. हे वयाच्या २४ व्या आणि ३८व्या वर्षी खूप यश मिळवतात. या व्यक्ती कमी वयात खूप पैसा कमावतात.

भाग्यांक ३

भाग्यांक ३ असणाऱ्या व्यक्तींवर गुरु ग्रहाचा आशीर्वाद असतो, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ते लवकर यश मिळवतात. हे वयाच्या ३२व्या वर्षी यशस्वी होतात.

भाग्यांक ४

भाग्यांक ४ असणाऱ्या व्यक्तींवर राहूची कृपा असते. भाग्यांक ४ असलेल्या व्यक्तींचे नशीब वयाच्या ३६ व्या वर्षापासून चमकू लागते. ते आयुष्यातील अनेक अडथळे सहजपणे पार करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात आणि आयुष्यात भरपूर पैसा, मान-सन्मान मिळवतात.

भाग्यांक ५

भाग्यांक ५ असणाऱ्या व्यक्तींवर बुध ग्रहाची कृपा असते. भाग्यांक ५ असलेले व्यक्ती वयाच्या ३२व्या वर्षी यशस्वी होतात. परंतु, या व्यक्तींनी नेहमी योग्य व्यक्तीची संगत करावी.

हेही वाचा : नुसता पैसा! ग्रहांचा सेनापती मंगळ करणार मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी

भाग्यांक ६

भाग्यांक ६ असलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा असते. त्यामुळे आयुष्यात कधीही यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हे वयाच्या २५ व्या वर्षानंतर खूप यशस्वी होतात. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना संपत्ती, समृद्धी मिळते.

भाग्यांक ७

भाग्यांक ७ असलेल्या व्यक्तींवर केतूची विशेष कृपा असते. या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात अनेकदा संधी मिळते. या व्यक्तींना वयाच्या २०व्या वर्षीच यश मिळू लागते. लहान वयातच ते खूप यशस्वी आणि श्रीमंत होतात. त्यांच्यासाठी आयुष्यातील ३०वे आणि ४४वे वर्षदेखील खूप भाग्यकारक आहे.

भाग्यांक ८

भाग्यांक ८ असलेल्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा असते. त्यामुळे त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. त्यांच्या वयाच्या ३६व्या आणि ४२व्या वर्षात भाग्याची साथ मिळते.

भाग्यांक ९

भाग्यांक ९ असणाऱ्या व्यक्तींना मंगळ ग्रहाची कृपा असते. त्यामुळे या व्यक्तींमध्ये साहसी गुण असतात. या व्यक्तींना वयाच्या २८व्या वर्षी खूप प्रसिद्धी मिळते. हे व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवतात.