October Born Girls: ऑक्टोबर महिना अनेक कारणांनी खास मानला जातो. ज्योतिषशास्त्र आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित काही मान्यतांनुसार, या महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा आणि प्रभावी असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यात नैसर्गिक आकर्षण, आत्मविश्वास आणि लोकांशी पटकन जुळवून घेण्याची क्षमता असते.

आपल्या गोड बोलण्याने आणि मनमिळावू स्वभावाने त्या कोणालाही सहज प्रभावित करतात. त्यामुळे मित्रपरिवार, कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणीही त्यांची वेगळी ओळख निर्माण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौंदर्य, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

अर्थात, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. मात्र, ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांनुसार ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींमध्ये काही समान गुण दिसून येतात. सकारात्मक विचारसरणी, धाडसी स्वभाव, प्रेमळ वागणूक आणि आयुष्य आनंदाने जगण्याची कला हे त्यांचे खास वैशिष्ट्य मानले जाते. त्या प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर नातेसंबंध जपणे, नवीन अनुभव घेणे आणि जीवनाचा प्रत्येक क्षण मनापासून जगणे यालाही त्या प्राधान्य देतात. आज आपण ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या अशाच काही खास स्वभाववैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुली खूप आकर्षक आणि प्रभावी स्वभावाच्या मानल्या जातात. या महिन्यात जन्मलेल्या मुली हुशार आणि सुंदरही असतात. त्या आपल्या बोलण्याने कोणालाही सहज प्रभावित करतात.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुली सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या आणि धाडसी असतात. त्या कोणतेही काम न घाबरता पूर्ण करतात. या महिन्यात जन्मलेल्या मुली कोणतीही परिस्थिती अतिशय शांतपणे आणि सहज हाताळतात.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींना आलिशान जीवन जगण्याची आवड असते. त्याचबरोबर त्यांना फिरायला जाणे आणि नवीन-नवीन वस्तू खरेदी करायलाही खूप आवडते. इतरांवर पैसे खर्च करताना त्या अजिबात विचार करत नाहीत. त्यांना आपल्या स्वप्नांच्या दुनियेत रमायला देखील खूप आवडते.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुली प्रेमाच्या बाबतीतही मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. त्या आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करण्यास अजिबात लाजत नाहीत. मैत्री असो किंवा प्रेम, त्या दोन्ही नात्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारा असतो. त्यांना चुकीच्या गोष्टी अजिबात सहन होत नाहीत. त्या खूप भावूकही असतात, पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे त्यांना चांगले जमतं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)