October Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, व्यापार, संवाद कौशल्य, शिक्षण आणि एकाग्रतेचा कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या स्थितीत होणाऱ्या बदलाचा परिणाम १२ राशींवरच नव्हे तर जगभरातही काही प्रमाणात दिसून येऊ शकतो.
बुध ग्रह ठराविक कालावधीनंतर रास आणि नक्षत्र बदलतो. अशाच प्रकारे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध तुळ राशीत भ्रमण करत स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहूच्या स्वाती नक्षत्रात बुध प्रवेश करत असल्यामुळे १२ राशींच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होऊ शकतो. हे राशीभविष्य चंद्र राशीनुसार सांगितले आहे. चला जाणून घेऊया, बुधाच्या स्वाती नक्षत्र प्रवेशामुळे कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळू शकतात…
द्रिक पंचांगानुसार, १ ऑक्टोबर २०२६, गुरुवारी सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी बुध स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत तो याच नक्षत्रात राहील. त्यानंतर बुध विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. आकाशातील २७ नक्षत्रांपैकी स्वाती हे १५वे नक्षत्र असून या नक्षत्राचा स्वामी राहू आहे आणि ही तुळ राशीतील नक्षत्र आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध दुसऱ्या भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे आर्थिक लाभाचे चांगले योग तयार होत आहेत. तसेच पैसे साठवण्यातही यश मिळू शकते. बँकिंग, फायनान्स आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. तुमच्या बोलण्यात गोडवा येईल आणि त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येईल.
अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनाही चांगला फायदा होऊ शकतो. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळखी वाढू शकतात. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लग्न भावात बुधाचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येतील. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायातही चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा मोठा ऑर्डर मिळू शकतो. त्यामुळे भविष्यात चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. फॅशन, कला, सर्जनशील क्षेत्र आणि डिझाइनिंगशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. आत्मविश्वासातही मोठी वाढ होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठीही हा काळ अनुकूल राहील. प्रेमसंबंधही चांगले राहू शकतात. अनेक दिवसांपासून एखाद्या योजनेवर काम करत असाल, तर आता त्यात यश मिळू शकते.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा स्वाती नक्षत्रातील प्रवेश शुभ ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहण्याची शक्यता आहे. सर्जनशीलतेतही मोठी वाढ होऊ शकते. त्याचा फायदा करिअर आणि व्यवसायात मिळू शकतो. विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच समाजात मान-सन्मान वाढण्याचेही योग आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
