Budh Vakri: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २४ ऑक्टोबर २०२६ रोजी बुध ग्रह तूळ राशीत वक्री होणार असून १३ नोव्हेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. बुध हा बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, व्यापार, गणित, तर्कशक्ती आणि करिअरचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे बुधाच्या वक्री चालीचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्योतिषांच्या मते, या काळात जुन्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता असून काहींना आर्थिक लाभाचेही संकेत आहेत. विशेषतः कन्या, तूळ, मकर आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या ग्रहस्थितीचा सकारात्मक परिणाम जाणवू शकतो.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्तींना जुन्या कामांचा आढावा घेण्याची संधी मिळेल. पूर्वीचे व्यावसायिक संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतात. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता असून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास फायदा होऊ शकतो.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीत प्रगतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा ग्राहक मिळू शकतात. वैयक्तिक आयुष्यातही काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कामाचा वेग वाढेल आणि जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. उत्पन्न वाढण्याचे संकेत असून करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात काही महत्त्वाचे बदल अनुभवायला मिळू शकतात. नवीन संधी मिळण्याबरोबरच जुन्या प्रकल्पांमधूनही फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत असून व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घेतल्यास लाभ होऊ शकतो.

या गोष्टींची घ्या विशेष काळजी

बुध वक्री असताना कोणताही मोठा आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, करार किंवा महत्त्वाची कागदपत्रे तपासूनच पुढील निर्णय घ्यावा. संवादात गैरसमज होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक गोष्ट नीट पडताळून पाहणे गरजेचे आहे. जुन्या योजना तपासण्यासाठी आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)