October Horoscope: मन आणि भावनांचा कारक चंद्र २ ऑक्टोबर रोजी मिथुन राशीत गोचर करणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, संवाद आणि वाणीचा कारक मानला जातो. जेव्हा चंद्र बुधाच्या राशीत किंवा त्याच्या प्रभावाखाली येतो, तेव्हा मन आणि बुद्धी यांचा उत्तम समन्वय तयार होतो. या काळात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. बोलण्यात गोडवा येतो आणि मनातील भावना सहज व्यक्त करता येतात.
आर्थिक लाभाचे योग जुळून येतात तसेच व्यापारात यश मिळण्याची शक्यता असते. मिथुन राशीतील चंद्राच्या गोचराचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल, तर काही राशींनी सावध राहण्याची गरज आहे. जाणून घेऊया, चंद्राच्या मिथुन गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आणि कोणत्या राशींनी काळजी घ्यावी.
कोणत्या राशींना मिळणार लाभ?
पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, चंद्र जेव्हा बुधाच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा बुधाच्या मित्र राशींना विशेष लाभ मिळतो. तर शत्रू राशींनी या काळात अधिक सावध राहणे गरजेचे असते.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना चंद्राच्या गोचरामुळे व्यापारात यश मिळू शकते. संवादकौशल्यात सुधारणा होईल. बोलण्याची पद्धत अधिक प्रभावी बनेल. मनातील भावना व्यक्त करण्यात यश मिळेल. बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता वाढेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. संवादाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. मानसिक शांतता लाभेल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळतील. निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल. मान-सन्मान वाढेल आणि रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल ठरू शकतो. व्यवसायात प्रगती होईल आणि मित्रांचे सहकार्य मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील आणि जुन्या मार्गांमधूनही आर्थिक फायदा होईल. बोलण्यात गोडवा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास लाभदायक ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना व्यवसायातील व्यवहारांत फायदा होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि मन स्थिर राहील. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बचतीकडे अधिक लक्ष द्याल. प्रवास लाभदायक ठरतील. एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदी राहील. मानसिक शांतता लाभेल. व्यवसाय करणाऱ्यांना विस्तारासाठी चांगल्या संधी मिळू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
