१० ऑगस्टला मंगळदेवाची बदलणार परिस्थिती; ‘या’ तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार मोठी खळबळ

ज्योतिषशास्त्रात मंगळाचे विशेष स्थान आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे असे म्हणतात. मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्याचा कारक आहे

१० ऑगस्टला मंगळदेवाची बदलणार परिस्थिती; ‘या’ तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार मोठी खळबळ
१० ऑगस्टला मंगळदेवाची बदलणार परिस्थिती(फोटो: संग्रहित फोटो)

Mangal Rashi Paivartan 2022: ऑगस्ट महिन्यात मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. १० ऑगस्ट रोजी मंगळ मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ संक्रमण रात्री ०९.४३ वाजता होईल. मंगळ हा धैर्य आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात मंगळाचे विशेष स्थान आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे असे म्हणतात. मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्याचा कारक आहे. मंगळ संक्रमणाचा प्रभाव काही राशींवर शुभ तर काही राशींसाठी अशुभ राहील. जाणून घ्या वृषभ राशीत मंगळाच्या आगमनामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल.

मेष राशी

मेष राशीच्या दुसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. या काळात तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्चाबाबत सावध राहा, अन्यथा आर्थिक बजेट बिघडू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. प्रवास घडतील. या काळात शत्रूपासून सावध रहा. आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील त्या या काळात जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

( हे ही वाचा: Surya Gochar 2022: १७ ऑगस्टपर्यंत या तीन राशींना मिळेल नशीबाची साथ; सूर्यदेवाच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांच्या १२व्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनात चढ-उतार पहावे लागतील. या काळात तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भागीदारीच्या कामात अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी देखील अडथळे येऊन काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात संयमाने वागणे कधीही चांगले असेल. जोडीदाराशी देखील मतभेद निर्माण होऊन नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेऊन वागल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.

तूळ राशी

मंगळ तुमच्या राशीच्या आठव्या घरात प्रवेश करेल. या काळात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वाहन वापरताना सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचा आवाज नियंत्रणात ठेवा. धीर धरा. या काळात आयुष्यात अनेक घटना घडू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे सर्व कामे व्यवस्थित होतील. वैवाहिक जीवनात देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, तुम्ही रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते टाळा मोठे नुकसान होऊ शकते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Raksha Bandhan 2022 : भावाच्या हातावर चुकूनही बांधू नका ‘ही’ राखी; ज्योतिषशास्त्रानुसार मानली जाते अशुभ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी