Jyeshtha Purnima 2024 Date: हिंदू धर्मात ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची भक्तांवर विशेष कृपा असते असे मानले जाते. या दोघांची पूजा केल्याने आयुष्यात सुख- शांती व समृद्धी लाभत असल्याची सुद्धा भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन आर्थिक चणचण दूर करून तुम्हाला धनवान बनवू शकते असा समज आहे. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा २१ जूनला सुरु होत आहे तर २२ जूनला संपणार आहे. मराठी पंचांगानुसार याच तिथीवर वटपौर्णिमा सुद्धा साजरी केली जाणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन राजयोग एकत्र एकाच राशीत निर्माण झाले असल्याने विशेष दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. मिथुन राशीतील त्रिगही, बुधादित्य व शुक्रादित्य योग काही राशींना या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो. शिवाय लक्ष्मी नारायण योग बनल्याने माता लक्ष्मीची तीन राशींवर कृपादृष्टी असणार आहे. या तीन राशी कोणत्या हे पाहूया..

वटपौर्णिमेला ‘या’ ३ राशींवर असणार माता लक्ष्मीची कृपादृष्टी

वृषभ रास (Taurus Marathi Horoscope)

वृषभ राशीच्या मंडळींसाठी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा ही खास असणार आहे. आपला सर्वात मोठा फायदा हा होईल की, आपल्या मनातून नकारात्मकता पूर्णपणे पुसून टाकली जाईल व सकारात्मक ऊर्जा शरीरात संचारेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल . आर्थिक मिळकतीचे नवे व वेगळे मार्ग मोकळे होतील. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील, सुख व शांतीचा अनुभव येईल. व्यापारी वर्गासाठी हाकालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. ज्यांचा व्यवसाय नाही पण त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ लाभाची ठरू शकते.

कर्क रास (Cancer Marathi Horoscope)

कर्क राशीच्या मंडळींवर धनाच्या देवीची विशेष कृपा असेल. आपल्याला एखादी परदेश प्रवासाची संधी लाभू शकते. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील. आपल्याला जोडीदाराची संपूर्ण साथ व प्रेम मिळू शकते. नातेसंबंध दृढ होतील व कौटुंबिक कलह संपेल. प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी व अडथळे दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी आपला मान- सन्मान वाढेल, नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढ लाभण्याची सुद्धा चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< १७ जून पंचांग: आज ज्येष्ठ एकादशीला ५६ मिनिटांचा मुहूर्त बदलणार राशींचे नशीब; मेष ते मीन राशींचं आजचं विधिलिखित वाचा

धनु रास (Sagittarius Marathi Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप शुभ असणार आहे. व्यावसायिक मंडळींना नव्या डील्स मिळू शकतात ज्यामुळे एकतर आपल्याला उत्तम नफा होईल पण त्याचबरोबरीने भविष्यासाठी उत्तम संपर्क सुद्धा जोडले जातील. नोकरदारांना वरिष्ठांच्या साथीने एखादे मोठे काम पूर्ण करता येईल. आपल्या नशिबात सरकारी नोकरीचा योग आहे, या अनुषंगाने काही खास व मोठे बदल येत्या काळात घडून येतील. जीवनात सुख व शांती असेल. विवाह इच्छुकांना उत्तम स्थळ सांगून येईल तसेच संततीच्या बाबत काहींना चांगली वार्ता मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)