Lucky Signs On Palm: असं म्हणतात की व्यक्तीचं नशीब हे त्याच्या हातात असतं, याचा मूळ अर्थ मेहनतीने तुम्ही तुमचं नशीब घडवू शकता असाही होतो. तरीही हातावरील निशाण, हस्तरेषा व ज्योतिष याविषयी अनेकांना कुतुहूल असतं. ज्योतिष व हस्तरेखा शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हातावर असे काही निशाण असतात जे त्यांच्या मेहनतीची दिशा ठरवतात. अनेकदा खूप मेहनत करूनही हवं तसं फळ मिळत नाही यामागे या हस्तरेखा कारण असू शकतात असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार हातावरील अशी कोणती चिन्हे आहेत ज्यामुळे तुमच्या यशाची रेखा स्पष्ट होते व धन, संपत्ती व समृद्धी प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो हे जाणून घेऊया..

हत्तीचे निशाण

हस्तरेखा शास्त्र सांगते की, हातावर हत्तीचे चिन्ह असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अशा व्यक्तींवर सरस्वती व लक्ष्मी या दोघांचा वरदहस्त असतो. हत्ती हे गणरायाचे प्रतिक आहे त्यामुळे अशा व्यक्ती बुध्दीवान, कलाकार असतात.चार चौघात त्यांना स्वतःची ओळख बनवता येते.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Marriage Astrology
‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी

माश्याचे निशाण

हस्तरेखा शास्त्र सांगते की, हातावर माश्याचे निशाणही शुभ असते. या व्यक्तींना परदेश वारीचे योग असतात. बहुतांश वेळा परदेशी गुंतवणुकीतून यांना अधिक फायदा होऊ शकतो. भौतिक सुख व आलिशान आयुष्य त्यांचे ध्येय असते.

Samudrik Shastra: चेहरा कसा वाचाल? भुवयांमध्ये अंतर असणाऱ्यांना आवडतं गॉसिप तर चंद्रकोर भुवई म्हणजे लग्नानंतर..

पालखीचे चिन्ह

हातावर पालखीचे निशाण असणाऱ्या व्यक्तींना लक्ष्मीचे वरदान असते असं म्हणतात. जितका अधिक खर्च तितकी अधिक मिळकत असं यांचं आयुष्य असतं मात्र अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूकीत ते खर्च करतात. समाजात मान व प्रतिष्ठा मिळवणे या व्यक्तींचे ध्येय असते.

स्वास्तिक चिन्ह

हस्तरेखा शास्त्र सांगते की, हातावर स्वास्तिक चिन्ह असणाऱ्या व्यक्ती धनवान असतात व यांच्यावर माता सरस्वतीची ही खूप कृपा असते. शिक्षण व राजकारणात नाव कमावण्याचे योग या व्यक्तींच्या नशिबात असतात. भौतिक सुखाइतकेच त्यांना मानाचे जीवन जगणेही आवडते.

कलश चिन्ह

हस्तरेखा शास्त्रानुसार हातावर कलश चिन्ह असल्यास या व्यक्ती धर्म क्षेत्रात नाव कमावू शकतात. श्रद्धाळू स्वभाव असल्याने त्यांचा देवावर अतूट विश्वास असतो.

सूर्याचे चिन्ह

हस्तरेखा शास्त्र सांगते की, ज्या व्यक्तींच्या हातावर सूर्याचे निशाण असते अशा व्यक्तींचे भविष्य व वर्तमान सूर्याप्रमाणेच तेजस्वी असते. नेतृत्व करण्याचा स्वभाव यांचा मूळ गुणधर्म असतो. अधिकारी पदावर काम करण्याचे यांचे ध्येय असते.

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)