Half Moon sign Meaning: हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार, हाताच्या रेषा पाहून लोकांचे भविष्य कळू शकते. हस्तरेषा पाहून संबंधित व्यक्तीचे करिअर, आर्थिक परिस्थिती, वैवाहिक जीवन इत्यादी कसे असेल हे तुम्ही जाणून घेऊ शकता. अनेक लोकांच्या तळहातावर चंद्रकोर तयार होते. जर तुम्ही तुमच्या दोन्ही हाताचे तळवे एकत्र जोडले आणि तळहाताच्या रेषा जुळल्यास अर्धा चंद्र तयार होत असेल तर ते खूप शुभ मानले जाते.

पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का, की तुमच्या तळहातावर चंद्रकोर तयार झाला तर त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो? चला तर मग जाणून घेऊ या..

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

जर एखाद्या व्‍यक्‍तीचे दोन्ही तळहात जुळविल्यास चंद्रकोर तयार होत असेल तर आणि दोन्ही हाताच्या ह्रदयरेषा सरळ जाऊन गुरु पर्वताच्या दिशेने जात असतील तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असू शकते.

हेही वाचा : चार दिवसांनी ‘या’ शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार? नशीब पालटून दोन मोठे ग्रह बनवू शकतात करोडपती

अस म्हणतात की, हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातावर चंद्रकोर असेल तर त्याला/तिला सुंदर आणि मनासारखा जोडीदार मिळतो. असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या तळहातावर चंद्रकोर असते, ती आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करते आणि आपल्या जोडीदाराकडून अशाच प्रेमाची अपेक्षा ठेवते.

हस्तरेषाशास्त्रानुसार ज्याच्या तळहातावर चंद्रकोर असते ती व्यक्ती खूप हुशार असते आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकते. त्याच्यात नेतृत्वक्षमता चांगली असते असे मानले जाते. अ

असे सांगितले जाते की, हस्तरेषाशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या तळहातावर अर्धचंद्र असतो, असे लोक मनापासून मैत्री टिकवून ठेवतात. असे लोक आपल्या मित्रांशी प्रामाणिक असतात आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहतात.

हेही वाचा : Haldi Ceremony: लग्नापूर्वी वधू-वराला हळद का लावली जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

हस्तरेषाशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या दोन्ही तळहातांवरील रेषा मिळून सरळ रेषा तयार होते, त्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय शांत आणि दयाळू असतो. तो कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही. अशा लोकांची विचारसरणी सकारात्मक असते आणि ते संयमाने अडचणींचा सामना करतात, असे मानतात