वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्याच्या कुंडलीमध्ये स्थित ९ ग्रहांच्या स्थानांचे विश्लेषण करून त्यांचे परिणाम माहित केले जातात. तशाच प्रकारे हस्तरेखा शास्त्रात मनुष्याच्या तळहातावर असणाऱ्या चिन्हांचे विश्लेषण करून परिणामांची माहिती करून घेतली जाते. माणसाच्या तळहातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. त्यातली एक रेषा म्हणजे धन रेषा. या रेषेचे विश्लेषण करून संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती मिळवली जाऊ शकते. या लेखात आपण हस्तरेखा शास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबाबत कशाप्रकारे माहिती मिळवली जाते हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्य रेखा :

सूर्य रेषा देखील व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक स्थिती दर्शवते. अनामिकेच्या (Ring finger) खालच्या भागास सूर्य पर्वत म्हटले जाते. यावर तयार झालेली रेषा जर सरळ असेल तर अशा लोकांना सरकारी नोकरी मिळाण्याची दाट शक्यता असल्याचे मानले जाते. या व्यक्ती प्रशासकीय पदांवर काम करणारे असतात. तसेच, असे मानले जाते की जर सूर्य रेषेमधून इतर रेषा निघून बोटाकडे वळत असतील तर यामुळे व्यवसायात यश मिळण्याची शक्यता वाढते. अशा व्यक्ती व्यापारात भरपूर पैसे कमावतात. या व्यक्ती ऐशो-आरामाचे जीवन जगणे पसंत करतात.

रोज रात्री एका विशिष्ट वेळी जाग येणं सामान्य नाही; यामागे दडलेले आहे ‘हे’ विशेष रहस्य

M चा आकार तयार होत असल्यास…

ज्या व्यक्तींच्या तळहातावर मस्तिष्क रेषा, जीवन रेषा आणि भाग्य रेषा एकत्र येऊ M आकार तयार होतो अशा लोकांना लग्नानंतर धनप्राप्ती होते, असे हस्तरेषा शास्त्रात सांगितले जाते. अशा लोकांचे नशीब त्यांच्या लग्नानंतर पलटते. या व्यक्ती ३०-५५व्या वर्षी खूप पैसे कमावतात.

त्रिकोणाचा आकार तयार होत असल्यास…

तळहातावर जीवन रेषा, भाग्य रेषा, मस्तिष्क रेषा किंवा हृदय रेषा, भाग्य रेषा आणि मस्तिष्क रेषा मिळून त्रिकोण चिन्ह बनत असेल तर आपल्या तळहातावर ही धनरेषा आहे. अशी रेषा असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक नव्हे तर अनेक स्त्रोतांकडून पैसे कमवाल. असे लोक व्यवसाय आणि नोकरी एकत्र करतात आणि दोन्ही माध्यमातून पैसे कमावतात.

लग्नामध्ये विलंब होत असल्यास नक्की करा ‘हे’ उपाय; लवकरच मिळेल खुशखबर

धनप्राप्तीसोबतच मिळते सामाजिक प्रतिष्ठा

आपल्या तळहातावर भाग्य रेषेतून निघून एक रेषा सूर्य पर्वतावर पोहचत असेल तर तुम्ही आर्थिक व्यवहारात भाग्यशाली असाल. तुम्ही सामाजिक क्षेत्रातही प्रतिष्ठा संपादन कराल. असे लोक कोणत्या ना कोणत्या प्रशासकीय पदावर कार्यरत असतात आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असतात. त्यांना महागड्या वस्तू घेण्याची आणि प्रवासाचीही आवड असते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palmistry line of wealth on the palms of people what this means pvp
First published on: 26-01-2022 at 12:49 IST