Bhishma Panchak Kaal 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात पंचक काळ हा अत्यंत संवेदनशील काळ मानला जातो. हिंदू धर्मात तो अत्यंत अशुभ काळ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीच्या शेवटच्या पाच नक्षत्रांमधून जातो तेव्हा पंचक योते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वभाद्रपद, उत्तरभाद्रपद आणि रेवती. हा काळ अंदाजे पाच दिवस टिकतो. धार्मिक श्रद्धेनुसार, पंचक काळात घरात पूजा करणे, लग्न करणे, नवीन वस्तू खरेदी करणे किंवा बांधकाम सुरू करणे यासारखे कोणतेही शुभ कार्य निषिद्ध मानले जाते. या काळात सुरू केलेल्या कामात वारंवार अडथळे येतात किंवा प्रतिकूल परिणाम मिळतात. त्याच वेळी या दिवसांच उपवास, पूजा आणि दान केल्याने हजारपट पुण्य मिळते. तर नोव्हेंबरमध्ये पंचक काळ कधी सुरू होतो आणि कोणते कार्य निषिद्ध मानले जातात हे जाणून घेऊया…
दृक पंचांगानुसार, पंचक १ नोव्हेंबर २०२५पासून सुरू होत आहे आणि ५ नोव्हेंबर रोजी संपतो. याला भीष्म पंचक म्हणतात. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पंचकला वैकुंठ पंचक किंवा हरी पंचक असेही म्हणतात.
याला भीष्म पंचक का म्हणतात?
महाभारत काळात जेव्हा भीष्म पितामह यांनी स्वेच्छेने मृत्यूचे व्रत घेतले, तेव्हा ते सूर्य उत्तरेकडे जाण्याची वाट पाहत होते. कार्तिक महिन्यातील एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत या पाच दिवसांत त्यांनी भगवान श्री कृष्णाचे ध्यान केले आणि पांडवांना धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष यांचे ज्ञान दिले. भगवान श्री कृष्णांनी या पाच दिवसांना भीष्म पंचक असेही नाव दिले. त्यांना अत्यंत शुभ मानले. म्हणूनच जंव्हा पंचक काळ एकादशीच्या आसपास येतो तेव्हा त्याला भीष्म पंचक म्हणतात. या काळात पूजा, उपवास आणि दान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते.
पंचक काळात या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात?
- पंचक काळात कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा मोठी गुंतवणूक सुरू करू नये
- पंचक काळात दक्षिणेकडे प्रवास करणे टाळावे
- घरावर छप्पर घालणे, रंगकाम किंवा बांधकाम पुढे ढकलावे
- फर्निचर किंवा पलंग बनवू नये
- या काळात नवीन वस्तू, कपडे किंवा महागड्या वस्तू खरेदी करणे टाळा
- पंचक दरम्यान जर एखाद्याचा मृत्यू झाला तर अग्नि पंचक दोष टाळण्यासाठी त्याचा पुतळा बनवून त्याद्वारे अंत्यसंस्कार करायचे अशी मान्यता आहे.
पंचक काळात काय करावे?
- पंचक काळात अशुभ परिणाम टाळण्यासाठी भगवान विष्णू आणि हनुमानजींची पूजा करा
- हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा
- दक्षिणेकडे प्रवास करण्यापूर्वी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
- जर कोणतेही काम तातडीचे असेल तर रेवती लक्षत्रात हवन किंवा दान केल्याने शुभ पळ मिळू शकते.
(टिप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
