31st July 2024 Panchang & Marathi Rashi Bhavishya: आज ३१ जुलै २०२४ (बुधवार) रोजी आषाढ महिन्यातील जेष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी आहे. आज कामिका एकादशी योगदेखील आहे. तसेच आज रोहिणी नक्षत्र सकाळी १० वाजून ०७ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजून २१ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल. तर जुलै महिन्याचा शेवटचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असणार आहे हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या. ३१ जुलै पंचांग व राशीभविष्य : मेष:- कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल. वृषभ:- अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस मनासारखा जाईल. मिथुन:- चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील. प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील. कर्क:- तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या. मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील. सिंह:- आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. कन्या:- मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील. मित्र परिवारात वाढ होईल. तूळ:- जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा. वृश्चिक:- शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. धनू:- तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल. मकर:- तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील. कुंभ:- तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. मीन:- घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावी लागेल. प्रेमात वाहून जाऊ नका. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर