4th August Panchang & Marathi Rashi Bhavishya: आज ४ ऑगस्ट २०२४ रोजी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. रविवारच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत अमावस्या कायम असेल. आज सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत सिद्धी योग असणार आहे. १ वाजून २५ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जागृत असणार आहे आणि त्यानंतर आश्लेषा नक्षत्र दिसेल. तर राहू काळ संध्याकाळी ५ वाजून १६ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल. तसेच अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. तर आज कोणावर सुखाच्या सरी बरसणार व १२ राशींचे अमावस्या विशेष राशी भविष्य काय असेल हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

०४ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य:

11th August 2024 sunday Panchang And Rashibhavishya panchang in marathi
११ ऑगस्ट पंचांग : धनसंचयात वाढ, जोडीदाराची उत्तम साथ अन् नोकरदारांना कौतुकाची थाप; मेष ते मीन राशींचा असा असेल सुट्टीचा रविवार
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
shravani shanivar 10th August 2024 Panchang And Rashibhavishya
श्रावणी शनिवार , १० ऑगस्ट पंचांग : नात्यात गोडवा, बक्कळ पैसा तर ‘या’ राशींवर असेल शनिदेवाची विशेष कृपा; वाचा तुमचं राशीभविष्य
14th August 2024 Panchang & Rashi Bhavishya
१४ ऑगस्ट पंचांग: धनलाभाचे संकेत, गुंतवणुकीतून नफा पण ‘या’ राशींनी आरोग्य जपा; इंद्र योग १२ पैकी कोणत्या राशींचं नशीब बदलणार? वाचा तुमचं राशीभविष्य
Nag panchami Vishesh Panchang And Rashibhavishya 9th august 2024
०९ ऑगस्ट पंचांग: स्वप्नपूर्ती, आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख ; ‘नागपंचमी’चा शुभ मुहूर्त तुमच्या राशीला काय फळ देणार? वाचा तुमचं भविष्य
25th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२५ ऑगस्ट पंचांग: शुक्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल वरदान; उत्पन्नात होईल वाढ तर नशिबाची मिळेल साथ; वाचा सुट्टी विशेष राशीभविष्य
Budh Asta In Leo 2024
दीप अमावास्येला अद्भुत योग; आजपासून  महिनाभर ‘या’ राशींवर चौफेर धनवर्षाव होणार? बुधलक्ष्मी होऊ शकते मेहेरबान
raksha bandhan 2024
९० वर्षांनतर रक्षाबंधनला निर्माण होणार दुर्मिळ योगायोग, या ३ राशींचे नशीब पलटणार, मिळणार अपार पैसा आणि प्रसिद्धी

मेष:- खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटिपित मन रमून जाईल.

वृषभ:- लहान प्रवास घडू शकेल. हातातील कलेतून आनंद मिळेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील.

मिथुन:- कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. बोलण्यातून सर्वांना आपलेसे कराल. जवळचे मित्र बर्‍याच दिवसांनी भेटतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

कर्क:- दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील. नवीन ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल.

सिंह:- निराश होणे टाळावे. एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मनात काहीशी चलबिचलता राहील. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

कन्या:- आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अपेक्षित लाभाने आपण खुश राहाल. कामात स्त्रीवर्गाचा चांगला हातभार लागेल. बुद्धीवर्धक कामे हाताळाल. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो.

तूळ:- जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. महत्त्वाच्या नोंदी करून ठेवाव्यात. केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. घरातील कामात अधिक वेळ जाईल.

वृश्चिक:- आध्यात्मिक आवड पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विशाल दृष्टीकोन ठेवून आपले मत मांडाल. तरुण वर्गाची कामात मदत मिळेल. मित्रांच्या ओळखीने काम होईल.

धनू:- अचानक धनलाभ होण्याची शक्यता. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळवाल. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर:- जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन:प्रत्यय येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल.

कुंभ:- आपल्या हातातील अधिकार लक्षात घ्यावेत. कोणतेही साहस करतांना सावध राहावे. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल.

मीन:- प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल. अति भावनाशील होऊ नका. दिवस मनासारखा घालवाल. खेळकरपणे समोरील गोष्टी हाताळाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर