6th August 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज ६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. यंदा पहिली मंगळागौर आजच्या दिवशी साजरी केली जाईल. श्रावणी मंगळवारी अनेक ठिकाणी मंगळागौरीचे पूजन केले जाते. नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते. तर आज मंगळवारी मघा नक्षत्र ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांपासून सुरु होईल ते ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. तसेच अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. तर आजचा मंगळवार १२ राशींना कसा जाईल याबद्दल जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

०६ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.

वृषभ:- येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

मिथुन:- मनोरंजनात्मक दिवस. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.

कर्क:- कामात अधिकार प्राप्त होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

सिंह:- मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.

कन्या:- घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. महिला सहकारी उत्तम मदत करतील.

तूळ:- व्यावसायिक कामातून आनंद मिळेल. एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.

वृश्चिक:- आर्थिक गैरसमज टाळावेत. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

धनू:- घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. मुलांशी सुसंवाद साधावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा.

मकर:- जोडीदारामुळे भाग्योदय होईल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.

कुंभ:- स्वप्नात जास्त रमू नका. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्पर्धेत भाग घ्याल.

मीन:- प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchang rashi bhavishya on tuesday 6th august mesh to mean zodiac signs financial benefits marriage negotiations and more horoscope in marathi asp
Show comments