Lazy Birth Dates : आपल्यापैकी बहुतेकांना आराम आवडतो. मात्र, समोर महत्त्वाची कामे प्रलंबित असतील तर अनेकांची झोप उडते आणि ती पूर्ण करण्याची घाई लागते. पण, काही जण मात्र “उद्या करू” असा विचार करत विश्रांतीला किंवा झोपेला अधिक प्राधान्य देतात. ही सवय नेहमीच आळशीपणाचे लक्षण नसते; अनेकदा ती थकवा, मानसिक ताण किंवा कामाचे योग्य नियोजन न झाल्याचेही संकेत असू शकते.
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा मूलांक त्यांच्या व्यक्तिमत्त्व, विचार आणि जीवनशैलीवर खोलवर प्रभाव टाकतो. त्यामुळे काही मूलांकाना आराम करायला भरपूर आवडते. असे म्हटले जाते की, अशी मंडळी कठोर परिश्रमापेक्षा आरामला अधिक महत्त्व देतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची गती अनेकदा मंदावते. १ ते ९ मूलांकांपैकी ६ मूलांक अनेकदा आळशी किंवा आराम या स्वभावाशी जोडला जातो. ज्यांची जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक ६ असतो.
आराम आणि सोयीकडे कल
ज्या लोकांचा मूलांक ६ असतो. साधारणपणे आरामदायक जीवन पसंत करतात. त्यांना लवकर उठणे, कठोर परिश्रम करणे किंवा सतत व्यस्त राहणे अजिबात आवडत नाही. त्यांच्या वागण्यात ‘उद्या करेन’ ही मानसिकता अनेकदा दिसून येते. त्यांना आराम, विश्रांती असणारे वातावरण आजूबाजूला प्रचंड आवडते.
कामापेक्षा विश्रांतीला प्राधान्य
तुमच्यासाठी विश्रांती ही चैनीची गोष्ट नसून एक गरज आहे. सततच्या कामाच्या ताणामुळे तुम्ही अनेकदा लवकर थकता आणि त्यामुळे काही वेळा काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती दिसून येते. मात्र, याचा अर्थ तुम्ही अयशस्वी आहात असा अजिबात होत नाही. योग्य नियोजन, स्पष्ट दिशा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही तुमची ऊर्जा अधिक प्रभावीपणे वापरू शकता आणि अपेक्षित यश सहज मिळवू शकता.
शुक्राचा प्रभाव
अंकशास्त्रानुसार, ६ या मूलांकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. शुक्र ग्रह आनंद, सौंदर्य, कला आणि भौतिक समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळेच या लोकांमध्ये सर्जनशीलता, आकर्षण, सौंदर्यदृष्टी दिसून येते. आपल्या कुटुंबाशी घट्ट नाते असते आणि ते इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असतात.
