Truths about people born on 3, 12, 21 : एखाद टेन्शन असेल किंवा पटकन निर्णय घेता येत नसेल तर आपल्यातील प्रत्येक जण एका खास व्यक्तीला फोन लावतो. त्याच्याकडे जो उपाय असतो तो तुमच्या समस्येचं किंवा अडचणीचं निवारण करतो. कदाचित या मंडळींचा मूलांक ३ असतो. तुमचाही जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला असेल तर अंकशास्त्रानुसार तुम्ही आयुष्यातील अडचण दूर करणारी माणसं म्हणून ओळखली जातात. तुमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय असतो. तुमच्या जन्मतारखेवर गुरु देवाची विशेष कृपा असते. म्हणूनच तुम्ही जवळच्या मंडळींना नेहमीच गुरूप्रमाणे मार्गदर्शन करता.
तुमच्याकडे ज्ञानाचा खजिना असतो आणि कोणतीही समस्या कशी सोडवायची याबद्दल तुम्हाला अचूक माहिती असते. म्हणूनच इतर लोक अनेकदा तुमचा सल्ला घेतात. चला, तर मूलांक ३ उत्कृष्ट मार्गदर्शक का असतात जाणून घेऊयात…
गुरूचा प्रभाव
ज्याप्रमाणे गुरु ग्रह सर्व देवांना मार्गदर्शन करतो, त्याचप्रमाणे तुम्ही ३ संकटात सापडलेल्यांना योग्य मार्ग दाखवतात. गुरु ग्रहाच्या थेट प्रभावामुळे लहानपणापासूनच बुद्धिमान, ज्ञानी आणि हुशार असतात. तुमच्यात उत्तम नेतृत्व क्षमता, ज्ञानाचा अथांग साठा असतो. यामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्याबरोबर समस्या देखील शेअर करतात.
सर्वात खास गुण
तुमचा सल्ला जीवनात भरकटलेल्या लोकांनाही योग्य मार्गावर परत आणू शकतो. तस्वभावाने धार्मिक, योग्य आणि अयोग्य याची सखोल समज तुम्हाला असते. तुम्ही कधीही तुमच्या मार्गापासून विचलित होत नाहीत. ध्येय साध्य केल्यावरच विश्रांती घेता. देवावर अफाट श्रद्धा असते आणि ते नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यात तुम्ही नेहमी धन्यता मानता.
अचूक असतो
कंटाळलेल्या व दुःखी लोकांना तुम्ही अंधारातून प्रकाशात आणतात. त्यांच्या मनात इतकी सकारात्मक ऊर्जा भरतात की, त्यांचे जीवन बदलून जाते. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाता. योग्य उपाय शोधतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. तुमचा स्वभाव दयाळू असतो, इतरांना मदत करायला तुम्हाला आवडते.
तर या अद्वितीय गुणांमुळे, मूलांक ३ असलेले लोक उत्कृष्ट सल्लागार ठरतात…
