Number 4 Personality Traits : अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेच्या आधारावर मूलांक काढला जातो, जो एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, करिअर, प्रेम जीवनाबद्दल बरेच काही सांगून जातो. प्रत्येक तारखेची बेरीज करून मिळणाऱ्या शेवटच्या अंकाला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म २७ तारखेला झाला असेल, तर २ + ७ = ९ ; म्हणजेच त्यांचा मूलांक ९ असेल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा मूलांक काढू शकता. तर आज आपण मूलांक ४ असलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ४ मानला जातो. या मूलांकाचा अधिपती ग्रह राहू आहे, ज्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असतो.
तुमच्या मूलांकाचा ग्रह कोणता?
अंकशास्त्रानुसार, मूलांक ४ चा अधिपती ग्रह राहू असतो. राहू हे रहस्य, आकस्मिक घटना आणि गोंधळाचे प्रतीक मानले जाते. या प्रभावामुळे, मूलांक ४ असलेल्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेकदा चढ-उतार अनुभवावे लागतात आणि परिस्थिती झपाट्याने बदलते. पण, या प्रभावामुळे ते तीक्ष्ण बुद्धीचे देखील ठरतात. त्यांच्यात आत्मविश्वासू असतो, पण कधीकधी स्वतःच्या मतांवर तुम्ही ठाम राहता.
स्वभाव
तुम्ही स्वभावाने खूप मेहनती आणि शिस्तप्रिय असतात. ध्येये साध्य करण्यासाठी परिश्रमपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करत असता. तुमच्याकडे तीक्ष्ण विचार करण्याची क्षमता असते आणि प्रत्येक समस्या शांत मनाने सोडवण्यात समाधान मानतात. नात्यांमध्ये विश्वास, निष्ठा आणि इतरांना मदत करणारे ठरता.
वाईट गुण आणि नाती
तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिविचार करणे. कधीकधी हट्टीपणाचा स्वभावामुळे इतरांशी जुळवून घेणे कठीण जाते. आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या असमर्थतेमुळे लोक गैरसमज करून घेऊ शकतात. शिवाय, आर्थिक स्थिरता राखणे कधीकधी आव्हानात्मक ठरू शकते.
करिअर
करिअरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मूलांक ४ असणारी मंडळी आयटी, अभियांत्रिकी, मीडिया, राजकारण, व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करतात. तुमची मेहनत आणि विचार करण्याची क्षमता तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरवते. शिवाय अभिनय आणि स्टार्टअप्ससारख्या सर्जनशील आणि जोखमीच्या क्षेत्रांमध्येही तुम्ही स्वतःचे नाव कमवू शकता.
