Which Mulank Is Creative : संख्याशास्त्रात आपण माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश-अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य अशा अनेक गोष्टींचा अंदाज संख्याशास्त्राच्या साहाय्याने करू शकतो. तसेच त्यांचे पूर्ण नाव, त्या नावाच्या स्पंदनातून व जन्मतारखेच्या साहाय्यातून आपण त्यांच्या उत्कर्षाचा आलेख मांडू शकतो.
अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेतून काढलेला मूलांक आपली विचारसरणी, स्वभाव, कठोर परिश्रम करण्याचा दृष्टिकोन आणि यशाकडे जाण्याची दिशा ठरवतो. मूलांक १ ते ९ पर्यंत असतात. पण, या ९ मूलांकांपैकी दोन विशिष्ट मूलांकाचा उल्लेख आवर्जून केला जातो. कारण हे मूलांक कलाक्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करतात. या दोन मूलांकामधील पहिला मूलांक ‘६’ आहे, तर दुसरा ‘२’ आहे. या दोन मूलांकामधे असलेल्या अद्वितीय गुणांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत…
मूलांक ६
तुमचा स्वामी ग्रह शुक्र आहे. कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो. शुक्राच्या प्रभावामुळे, तुम्ही सुंदर आणि अत्यंत सर्जनशील असता. तुम्ही चित्रकला, लेखन, अभिनय, संगीत या क्षेत्रांमध्ये प्रचंड यश संपादन करू शकतात. शिवाय, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि बोलण्याची पद्धतीचे इतरांकडून खूप कौतुक केले जाते. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्ही सर्जनशीलता ओतता. गायनातून किंवा एखादे वाद्य वाजवून ते सामाजिक मेळाव्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतात.
मूलांक २
तुमचा स्वामी ग्रह ‘चंद्र’ आहे. कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक २ असतो. चंद्राच्या प्रभावामुळे तुमची कल्पनाशक्ती विकसित होते. ही कल्पनाशक्तीच तुम्हाला उत्कृष्ट कलाकार बनवते. तुमच्यात यशस्वी लेखक, पटकथा लेखक, चित्रकार आणि गायक बनण्याची प्रचंड क्षमता असते. तुमचा स्वभाव काहीसा अंतर्मुखी असतो. परिणामी, त्या अनेकदा इतरांपासून अलिप्त राहणाऱ्या, स्वतःच्याच विश्वात रमलेल्या असतात. पण, जेव्हा जेव्हा त्या आपली कला लोकांसमोर सादर करतात, तेव्हा प्रत्येकजण त्यांच्या कलेने आणि व्यक्तिमत्त्वाने भारावून जातात.
