Numerology Predictions: अंकशास्त्राची निर्मिती जगात सर्वप्रथम आपल्या प्राचीन भारतात झाली. हाताची बोटे मोजता मोजता माणसाने गणिताचा पाया घातला आणि कालांतराने ज्योतिषशास्त्रातील ग्रहांच्या माध्यमातून संख्याशास्त्राचा जन्म झाला.संख्याशास्त्रात आपण माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश-अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य अशा अनेक गोष्टींचा अंदाज संख्याशास्त्राच्या साहाय्याने करू शकतो. तसेच त्यांचे पूर्ण नाव, त्या नावाच्या स्पंदनातून व जन्मतारखेच्या साहाय्यातून आपण त्यांच्या उत्कर्षाचा आलेख मांडू शकतो. आज आपण अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट जन्मतारखांवर जन्म झालेल्या व्यक्तींचा चांगला स्वभाव त्यांना कसा कष्ट देण्यास कारणीभूत ठरू शकतो हे पाहूया…
‘या’ जन्मतारखेच्या व्यक्ती चटकन समोरच्यावर विश्वास टाकतात पण…
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे अशा लोकांचा मूलांक दोन असतो. सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड. समाजकार्य हा यांचा आवडता छंद. सर्वांना नि:स्वार्थीपणे मदत करण्याची वृत्ती. स्वभाव काहीसा भित्रा असला तरी दिलेला शब्द पाळण्यात या व्यक्ती नेहमीच पुढेअसतात. यांच्याशी कोणी गोड संवाद साधला की त्या पूर्णपणे त्या व्यक्तीवर विश्वास टाकतात. खरेतर ‘अतिविश्वास टाकणे’ हा एक नकारात्मक शक्तीचाच भाग आहे आणि खूपदा ही माणसे त्यात फसतात, तर काही वेळा अति शंकेखोरपणा, अतिचिकित्सा यामुळेच आलेल्या सुसंधी गमावतात.
अति भावुक, क्षमाशील वृत्ती. त्यामुळे वागण्यात सौजन्याचा अतिरेक होते. ‘सॉरी’ हा शब्द यांच्या जिभेवर सतत घोळत असतो. त्यामुळे काही प्रसंगांत यांच्या साधेपणाचा खूप फायदा घेतला जातो.
हे ही वाचा<< केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींना तिहेरी धनलाभ मिळणार? शनीकृपेने ‘या’ रूपातून मिळू शकते लक्ष्मी
याशिवाय ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ तारखांना झाला असेल, त्या सर्वांचा मूलांक तीन असतो. यांची स्वभाव वैशिष्ट्य पाहायला गेल्यास, क्षमाशीलता आणि चूक कबूल करण्याचे औदार्य मानून या व्यक्ती आपल्या सुस्वभावाचे दर्शन घडवीत असतात. पण दुसऱ्याला समजून घेताना स्वत:चाही विचार करायला ही मंडळी विसरतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.