Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना आठ ऑगस्टला मिळेल आनंदाची बातमी; नोकरी-व्यवसायात प्रगतीची शक्यता

अंकशास्त्र व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते.

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना आठ ऑगस्टला मिळेल आनंदाची बातमी; नोकरी-व्यवसायात प्रगतीची शक्यता
'या' तारखांना जन्मलेल्या लोकांना आठ ऑगस्टला मिळेल आनंदाची बातमी(फोटो:संग्रहित फोटो)

Numerology Horoscope 8 August 2022: ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेण्यास मदत करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रातही संख्या असतात. त्या क्रमांकाला मूलांक म्हटलं जातं. हा मूलांक आपल्याला जन्मतारीखेवरून काढता येतो. या मूलांकावरून आपल्याला आपले भविष्य समजू शकते. खरं तर, जन्मपत्रिकेत मूलांक दिलेला असतो. मात्र, ज्या व्यक्तींना त्यांचा मूलांक माहीत नाही, ती व्यक्ती स्वतः देखील मूलांक काढू शकते. कोणत्याही व्यक्तीचा मूलांक जाणून घेण्यासाठी त्याची जन्मतारीख जोडा. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २२ तारखेला झाला असेल, तर २+२= ४. अशा स्थितीत व्यक्तीचा मूलांक ४ असेल. तर आज आम्ही तुम्हाला असे काही मूलांक सांगणार आहोत, कि तो मूलांक असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात ८ ऑगस्टचा दिवस खास असेल. तर जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही.

मूलांक १

आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. संयमाने काम करा. कोणत्याही कामात घाई करू नका. या दिवशी खर्च जास्त होईल. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. वाहन वापरताना काळजी घ्या.

मूलांक २

८ ऑगस्टचा तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. धीर धरा. खर्च जास्त होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. भावनेने महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.

( हे ही वाचा: Surya Gochar 2022: १७ ऑगस्टपर्यंत या तीन राशींना मिळेल नशीबाची साथ; सूर्यदेवाच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस)

मूलांक ३

हा दिवस तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी नवीन समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. भावनेतून निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक ४

८ ऑगस्टचा तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही मार्गी लागतील. या काळात एकाग्रता राखा. खर्च जास्त होईल. जर तुम्हाला महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत असू शकतो.

(हे ही वाचा: Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी कधी आहे? पूजेचा विधी, तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)

मूलांक ५

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक ६

आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवल्यास चांगले. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.

( हे ही वाचा: Shukra Gochar 2022: ७ ऑगस्टपासून या राशींचे चमकणार भाग्य; शुक्रदेवाची असेल विशेष कृपा)

मूलांक ७

हा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. भविष्याबद्दल मनात भीती राहील. आधीच रखडलेल्या कामांमध्ये प्रयत्न केल्यावर यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेतून निर्णय घेऊ नका. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक ८

हा दिवस तुमचा दिवस आनंदाने भरलेला जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. आधीच रखडलेली कामे होऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. तुमचे आरोग्य सामान्य राहील.

( हे ही वाचा: बुध २० दिवस सिंह राशीत राहील; या काळात ‘या’ चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल)

मूलांक ९

तुमचा दिवस संधींनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्च जास्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. तुमचे आरोग्य सामान्य राहील.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार ७ ऑगस्ट २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी