Numerology For Abroad Job : परदेशात जाऊन काम करणे अनेकांचे स्वप्न असते. पण, ज्योतिषशास्त्रानुसार जन्मतारखेची केलेली बेरीज एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, आवडीनिवडी आणि करिअरची दिशा याबद्दल अनेक संकेत देऊ शकतो, ज्याला मूलांक म्हंटले जाते. काही विशिष्ट मूलांकांना परदेशात प्रवास करणे, दुसऱ्या देशात काम करणे किंवा तिथे स्थायिक होण्याच्या अधिक संधी मिळतात. तर हे मूलांक कोणते याबद्दल जाणून घेऊयता.

मूलांक ४

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ४ आहे. तुम्ही चौकटीबाहेरचा विचार करणारे मानले जाता. नवीन ठिकाणी जाऊन करिअर करणे, दीर्घ काळासाठी परदेशात राहणे तुमच्यासाठी बेस्ट असते. तुम्ही तांत्रिक व आयटी-संबंधित क्षेत्रांमध्ये आवड आणि यश मिळते, असे मानले जाते. त्यामुळे, परदेशातील तंत्रज्ञानाशी संबंधित संधी त्यांच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कधीकधी, परदेशात प्रवास करण्याची किंवा काम करण्याची संधी अनपेक्षितपणे मिळू शकते.

मूलांक ५

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. हा मूलांक प्रवास व बदलाशी संबंधित आहे. अशा लोकांना नवीन लोकांना भेटण्यात, विविध ठिकाणे पाहण्यात, नवीन अनुभव मिळवण्यात रस असतो. त्यांचे संवाद कौशल्य व व्यावसायिक चातुर्य त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकते. म्हणूनच मूलांक ५ असलेल्या लोकांना परदेशी कंपन्या, व्यापार, बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता जास्त मानली जाते.

मूलांक ७

७, १६ किंवा २५ तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मूलांक ७ असतो. स्वभावाने जिज्ञासू व चौकस असता. त्यांना नवीन ठिकाणे आणि विविध अनुभव घेण्याची इच्छा असते. तुम्हाला संशोधन, तंत्रज्ञान, कोडिंग, आध्यात्मिक क्षेत्रात परदेशात संधी उपलब्ध होतात असे मानले जाते. प्रतिभा अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकतात आणि एक नवीन ओळख निर्माण करू शकतात.

मूलांक ९

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ९ असतो. तुमचा मूलांक ऊर्जा, धैर्य, उत्साहाशी संबंधित आहे. असे लोक आव्हानांना सामोरे जाण्यास मागे हटत नाहीत आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. या स्वभावामुळे मूलांक ९ ला परदेशात करिअरच्या चांगल्या संधी मिळतात. मोठ्या कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नवनवीन ठिकाणे आणि संस्कृती समजून घेण्यामधील तुमची आवड परदेशातील राहण्याचा अनुभव अधिक सुलभ करू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)