आचार्य चाणक्य हे अत्यंत बुद्धिमान आणि कार्यक्षम राजकारणी होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये व्यक्तीला यश मिळवण्याचे मार्ग तर सांगितले आहेतच, पण त्या व्यक्तीने कुठे राहावे आणि कुठे नाही याबद्दलही त्यांनी आपल्या ‘चाणक्य नीति’ या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे. त्याचबरोबर अकाली वृद्धात्वाबाबतही त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितलं. चौथ्या अध्यायातील १७ व्या श्लोकात पुरुष, स्त्रिया आणि घोडे यांच्या वृद्धत्वाचे कारण सांगितले आहे. चला जाणून घेऊया की चाणक्यांच्या मते, अकाली वृद्धत्व कधी येतं?
अधवा जरा मनुष्याणां वाजिनां बन्धनं जरा।
अमैथुनं जरा स्त्रीणां वस्त्राणामातपो जरा।।
जो माणूस खूप चालतो किंवा प्रवास करतो तो लवकर म्हातारा होतो. प्रवासाचा थकवा आणि खाण्यापिण्याच्या विकारांचा शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. या उलट घोड्यांना सतत बांधून ठेवले तर ते लवकर म्हातारे होतात. सतत बांधून ठेवलेला घोडाही लवकर म्हातारा होतो. असे करणे त्याच्या शारीरिक स्वभावाच्या विरुद्ध आहे. महिलांना शारीरिक सुख मिळाले नाही तर त्या लवकर वृद्ध होतात.
Chanakya Niti: जीवनात आर्थिक संकट येण्याची पाच लक्षणं, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
चाणक्य शेवटी म्हणतात की, कोणतेही कापड जास्त वेळ उन्हात ठेवले तर ते जुने होते. उन्हात ठेवल्याने कपड्याचा रंग निघून जातो आणि तो रंगहीन कापड जुना दिसतो.