What Astrology Says About You S & P Letter : ज्योतिषशास्त्रानुसार, नाव केवळ तुमची ओळखच सांगत नाही, तर ते तुमच्या व्यक्तिमत्त्व आणि जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये देखील उघड करते. म्हणूनच मुलांची नावे खूप काळजीपूर्वक ठेवली पाहिजेत. बहुतेक लोकांच्या नावाचे पहिले अक्षर त्यांच्या जन्म राशीवरून ठेवले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम होतो.
खासकरून नावाच्या पहिल्या अक्षराचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर खोलवर परिणाम होताना दिसतो. विशेषतः काही अक्षरे बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक मानली जातात. चला तर मग, कामाप्रती समर्पण आणि नात्यांमधील प्रामाणिकपणा दर्शवणाऱ्या खास अक्षरांविषयी आज आपण जाणून घेऊया…
‘P’ अक्षराने नाव सुरु असणारी मंडळी कशी असतात?
तुम्ही खूप बुद्धिमान आणि सखोल विचार करणारे मानले जातात. अगदी योग्य निर्णय घेऊन काम पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही तत्त्वज्ञानी असतात. कामाप्रती प्रेम आणि नात्यांमध्ये प्रामाणिक राहणे पसंत करतात. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करायला तुम्हाला आवडते. निर्णय घेण्याची क्षमता खूप प्रबळ असते आणि अनेकदा इतरांना योग्य सल्ला देण्यात पारंगत असतात. आयुष्यभरासाठी ज्यांना आपलं मानतात, त्यांच्याबरोबरच कायमस्वरूपी राहणे पसंत करतात.
‘S’ अक्षराने सुरू होणारी मंडळी कशी असतात?
तुम्ही खूप मेहनती असतात. कामात एकदम रमून जाता, यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करता. नवीन गोष्टी पटकन शिकतात, आपली ध्येये साध्य करतात. त्यांची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. इतरांसारखा चालण्याऐवजी स्वतःचा मार्ग तयार करणे पसंत करतात. निर्मळ मनाचे असतात आणि त्यांच्या मनात जे असते ते बोलतात. त्यांना उगीच जास्त बोलणे आवडत नाही.
