आपल्या जीवनात अंकांना खूप महत्त्व आहे. काही अंक आपल्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात हे तुम्ही पाहिलेच असेल. तसेच संख्याशास्त्रात १ ते ९ पर्यंतच्या संख्येचे वर्णन उपलब्ध आहे. या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य आहे. आज आपण मूलांक ५ बद्दल सांगणार आहोत. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या ५ आहे. ज्याचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव, या राशीचे लोकं धनात भर घालण्यात तरबेज मानले जातात. तसेच या मुलांकाची लोकं चांगले बँक बॅलन्स बनवतात. चला जाणून घेऊया या राशीच्या लोकांच्या खास गोष्टी…

पैसे जोडण्यात असतात तरबेज

मूलांक ५ असलेले लोकं संपत्ती वाढवण्यात पटाईत असतात. ही लोकं चांगले बँक बॅलन्स बनवतात. तसेच योग हा मनी माइंडेड आहे. हे लोकं मोकळेपणाने खर्च करणे आणि कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवतात. बुध ग्रह देखील वाणीचा कारक मानला जातो. त्यामुळे या लोकांची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. ही लोकं व्यवसायात नवीन कल्पना वापरून भरपूर पैसा कमावतात.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
Astrology People of this zodiac sign are good at making money
Astrology: या राशीचे लोक पैसे कमावण्यात असतात निपुण! शनिच्या कृपेने होतात मोठे व्यापारी आणि धोरणकर्ते

संकटातही राहतात शांत

मूलांक ५ असलेले लोकं स्वतःमध्ये सर्व प्रकारचे गोष्टी शेअर करतात. मूलांक ५ चे लोकं आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रत्येक परिस्थिती हाताळतात आणि प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात. क्रमांक ५ असलेल्या लोकांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो. सहसा, ते त्यांचे सर्व काम घाईघाईने करतात आणि यामुळे अनेक वेळा दुखापत होते. ही लोकं स्पष्टवक्तेही असतात आणि जास्त बोलके असतात.

मोठे व्यापारी बनतात

मूलांक 5 असलेल्या लोकांना व्यापार-उद्योगात चांगले यश मिळते. नाहीतर ही लोकं बँकेत नोकरी करणारे शिक्षक किंवा प्रशिक्षक असतात. त्यांना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान आहे. या मूलांक असलेल्या लोकांना मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच ही लोकं लहान वयात मोठे व्यापारी बनतात. व्यवसायात तुम्ही तुमच्या बोलण्याने समोरच्या लोकांना आकर्षित करून भरपूर पैसे कमावता.

गणपतीची पूजा करावी

मूलांक पाचव्या क्रमांकाच्या लोकांनी बुध देवाची पूजा करावी. या अंकाच्या लोकांसाठी माता सरस्वती आणि श्रीगणेशाची उपासना खूप शुभ राहील. गणपतीची आराधना केल्याने त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन कीर्ती वाढते. यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत राहील.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)