चातुर्मासात ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार विशेष लाभ; १० जुलैपासून मिळू शकतात अनेक शुभवार्ता

चातुर्मासाचे हे चार महिने तीन राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर असणार आहेत. जाणून घेऊया या राशींबद्दल.

zodiac signs will get special benefits in Chaturmas
हे चार महिने उपासनेच्या दृष्टीने खूप खास आहेत. (Photo : Jansatta)

हिंदू धर्मात चातुर्मास महिन्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. यंदाचा चातुर्मास १० जुलैपासून सुरू होत आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने क्षीरसागरात निद्रा घेतात. यामुळे या चार महिन्यांत कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य थांबते. हे चार महिने उपासनेच्या दृष्टीने खूप खास आहेत. हे चार महिने तीन राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर असणार आहेत. जाणून घेऊया या राशींबद्दल.

  • मेष

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी चातुर्मास लाभदायक ठरेल. या काळात नोकरीच्या अनेक नवीन ऑफर मिळू शकतात. त्याच वेळी नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसाय वाढेल. या दरम्यान, नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील, जे तुमच्यासाठी अनुकूल असतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणारे लोकही या काळात चांगली कमाई करू शकतात.

जुलै महिन्यात ‘हे’ मोठे ग्रह करणार संक्रमण; जाणून घ्या राशींवर काय परिणाम होणार

  • कन्या

चातुर्मासाचे हे चार महिने तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दिलेले पैसे चातुर्मासात परत मिळू शकतात. त्याचबरोबर आर्थिक स्थितीही मजबूत असेल. मीडिया, फिल्म लाइन, मार्केटिंग क्षेत्राशी निगडित लोकांसाठी देखील हा काळ उत्तम आहे.

  • वृश्चिक

ज्योतिषशास्त्रानुसार हे चार महिने या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. करिअर आणि बिझनेसमध्ये भरपूर यश मिळेल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. या काळात चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात, कुटुंबात आनंद येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People of these three zodiac signs will get special benefits in chaturmas many good news can be obtained from 10th july pvp

Next Story
Astrology: यंदाचा पावसाळा तुमच्यासाठी ठरु शकतो लकी; ‘हे’ उपाय करून पहा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी