scorecardresearch

Astrology: ‘या’ राशीच्या लोकांच्या नाकावर असतो नेहमी राग, वाईट सवयीमुळे ते आयुष्यभर करतात पश्चात्ताप

राग हा एक असा दोष आहे जो केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही तर इतरांचे जीवन देखील संकटात टाकतो.

zodiac-Signs-4
प्रातिनिधिक फोटो

Astrology, Zodiac Sign: गीतेत क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला आहे. राग हा एक असा दोष आहे जो केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही तर इतरांचे जीवन देखील संकटात टाकतो. राग टाळण्याचा प्रयत्न करा. या लोकांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांना जास्त राग येतो.ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या राशीवर पाप आणि अग्निमय ग्रह पडतो तेव्हा त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा राग येतो. मंगळ, राहू आणि केतू यांचा राग येण्यात महत्त्वाची भूमिका आहे.

वृषभ राशी (Taurus)

या राशीचे लोक खूप साहसी आणि उत्साही असतात. त्यांचा रागही लवकर येतो. त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप चांगले-वाईट बोलतात. त्यांना शांत करणे खूप कठीण होते. या राशीचा स्वामी मंगळ आहे. जास्त रागामुळे काही वेळा त्यांना वैवाहिक जीवनातही समस्यांना सामोरे जावे लागते.

(हे ही वाचा: Shani Transit 2022: ३० वर्षांनंतर ‘शनिदेव’ कुंभ राशीत करणार प्रवेश, ‘या’ दोन राशींना होऊ शकतो धनलाभ)

सिंह राशी (Leo)

या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. ते खूप भावनिकही आहेत. त्यांना छोट्याशा गोष्टीचे वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडतात. त्यांना प्रेमसंबंधात अडचणी येतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People of these zodiac signs are very angry ttg

ताज्या बातम्या