scorecardresearch

‘या’ राशींच्या लोकांना मिळणार शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती; जाणून घ्या यामागील कारण

जेव्हा शनिदेव आपली राशी बदलतात, तेव्हा शनीची साडेसाती कोणत्या ना कोणत्या राशीवर सुरू होते. अशा स्थितीत त्या राशीच्या लोकांना शनीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

'या' चार राशींच्या आयुष्यातील सर्व दुःख होणार दूर; शनि करणार आर्थिक बाजू मजबूत

शनिची हालचाल अतिशय संथ असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. सध्या शनि मकर राशीत विराजमान आहे, मात्र मकर राशीतून बाहेर पडल्यानंतर लवकरच शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा शनिदेव आपली राशी बदलतात, तेव्हा कोणत्या ना कोणत्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते. अशा स्थितीत त्या राशीच्या लोकांना शनिच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर ज्या राशीतून शनिदेव बाहेर पडतील त्या राशीच्या लोकांना शनिच्या महादशेपासून मुक्ती मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना शनिच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

२०२२ मध्ये ‘या’ राशीच्या लोकांना साडेसतीपासून मुक्ती मिळेल

२९ एप्रिल २०२२ रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील. शनिच्या या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना शनि साडेसतीच्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. तर दुसरीकडे काही राशींवर शनिची महादशा सुरू होईल. ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीच्या व्यक्ती साडेसातीच्या प्रभावापासून मुक्त होतील. त्याचबरोबर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांनाही साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

खुर्चीवर बसण्याची पद्धत सांगते माणसाचे खरे व्यक्तित्त्व; स्वभाव जाणून घेण्याचा खास मार्ग

शनि वाढवणार ‘या’ राशीच्या लोकांच्या अडचणी

२९ एप्रिल २०२२ रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील. परंतु १२ जुलै रोजी ते पुन्हा मकर राशीत प्रतिगामी होतील. त्यानंतर मिथुन, तूळ आणि धनु राशीवर शनीची दशा पुन्हा सुरू होईल. या तिन्ही राशींना सन २०२३ मध्ये शनीच्या दशेपासून मुक्ती मिळेल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People of these zodiac signs will get relief from the troubles of shani find out the reason behind this pvp

ताज्या बातम्या