scorecardresearch

नातेसंबंधांच्या बाबतीत खूपच भावनिक असतात ‘या’ राशींचे लोक; मनाला लावून घेतात प्रत्येक लहान गोष्ट

काही लोक नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घेतात आणि त्यांच्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आपल्या हृदयात जपून ठेवतात.

नातेसंबंधांच्या बाबतीत खूपच भावनिक असतात ‘या’ राशींचे लोक; मनाला लावून घेतात प्रत्येक लहान गोष्ट
काही लोक नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घेतात. (Instagram/Alia Bhatt)

आपल्या आजूबाजूला असे अनेक मित्र किंवा नातेवाईक असतात, जे गोष्टी-गोष्टीला भावुक होतात आणि त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टी भावनांशी निगडित असते. असे लोक नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घेतात आणि त्यांच्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आपल्या हृदयात जपून ठेवतात. एवढेच नाही तर असे लोक त्यांच्या भूतकाळातील गोष्टी कधीच विसरत नाहीत आणि त्यांना नॉस्टॅल्जिक व्हायला आवडते.

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीच्या मदतीने एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किती भावनिक आहे हे सहज जाणून घेता येते. आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या नातेसंबंधांच्या बाबतीत अतिशय भावुक असतात.

  • कर्क

नातेसंबंधांच्या कर्क राशीचे लोक भावुक होण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतात. असे लोक खूप नॉस्टॅल्जिक असतात आणि नातेसंबंधात खूप भावनिकरित्या जोडलेले असतात. जुनी मैत्री किंवा कोणतेही खास नाते तोडणे त्यांच्यासाठी कठीण असते आणि ते त्यांचे नाते आयुष्यभर टिकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.

तूळ राशीमध्ये होणार चार ग्रहांची युती; चतुर्ग्रही योगामुळे ‘या’ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता

  • मीन

मीन राशीचे लोक ज्यांच्याबरोबर नाते तयार करतात, त्यांच्याशी भावनिकरित्या संलग्न होतात. त्यांना आवडत असलेल्या लोकांशी ते मनापासून जोडले जातात. ज्यांच्याशी त्यांचे नाते तुटले आहे, त्यांनाही ते वर्षानुवर्षे आठवतात.

  • वृषभ

जर तुम्ही कधी वृषभ राशीच्या व्यक्तीबरोबर नात्यात आलात, तर ते तुमच्याप्रती किती समर्पित आणि प्रेमळ आहेत, याचा प्रत्यय तुम्हाला लगेचच येईल. ते त्यांच्या नात्याप्रती खूपच प्रामाणिक असतात. त्यामुळेच ब्रेकअपनंतरही ते तुमचा विचार करणे थांबवू शकत नाहीत.

  • मकर

मकर राशीचे लोक देखील भावनिक असतात आणि त्यांच्यासाठी नात्यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. अशा परिस्थितीत, त्यांना कितीही त्रास होत असला तरीही ते त्यांच्या भूतकाळातून बाहेर पडू शकत नाहीत.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.