अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे राशी आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे राशीतत्त्व आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगते. अनेकदा लोक तक्रार करतात की, त्यांचा जोडीदार खूप ‘फ्लर्टी’ आहे किंवा ते एका जागी थांबू शकत नाहीत. अंकशास्त्रानुसार, यामध्ये त्याची जन्मतारीख मोठी भूमिका बजावू शकते. खेळकरपणा, सामाजिक होण्याची इच्छा आणि नवीन लोकांना भेटायला आवडणे यांसारखी काही विशेष राशीतत्त्वं आहेत. चला त्या मूलांकाबद्दल जाणून घेऊया.
या तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने ‘फ्लर्टी’ असतात (People born on these dates are ‘flirty’ by nature.
मूलांक ३ (कोणत्याही महिन्याची ३०, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेले लोक)
या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. हे लोक स्वभावाने खूप मनमिळाऊ असतात. आपल्या गोड बोलण्याने ते कोणाचेही मन जिंकतात. जरी ते ‘फ्लर्टी’ असले तसेच एकनिष्ठ असू शकतात, तरी त्यांच्या सामाजिक सवयी अनेकदा लोकांकडून चुकीच्या समजल्या जातात. हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.
मूलांक ५ (कोणत्याही महिन्याची ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेले लोक)
मूलांक ५ स्वामी बुध आहे, ज्याला ग्रहांचा राजकुमार आणि बदलाचा कारक मानले जाते. या तारखेला जन्मलेले लोक खूप हुशार आणि बोलके असतात. त्यांची विनोदबुद्धी कमालीची असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना नात्यांमध्ये लवकर कंटाळा येतो, पण त्यांना मित्र बनवायला आणि नवीन लोकांशी फ्लर्ट करायला आवडते.
मूलांक ६ (कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४तारखेला जन्मलेले लोक)
मूलांक ६ चा स्वामी शुक्र आहे, जो प्रेम आणि सुखांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. हे लोक अत्यंत आकर्षक आणि सौंदर्य प्रेमी असतात. यांच्या व्यक्तिमत्त्वात एक कमाल असते. त्यांना लोकांमध्ये राहायला आणि त्यांच्याकडून प्रशंसा मिळवायला आवडते, त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडासा फ्लर्ट करणारा आहे.
कोणाचाही ‘फ्लर्टी’ स्वभाव हा नेहमीच त्यांच्या नात्यासाठी धोका असतो असे नाही. अनेकदा तो फक्त त्यांच्या बोलक्या आणि समाजात मिसळून राहणाऱ्या स्वभावाचा भाग असतो. मात्र, जर हा स्वभाव मर्यादेबाहेर गेला तर नात्यात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराचा स्वभाव समजून घेणे आणि त्याच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा या गोष्टी नात्याला मजबूत बनवतात. अंकशास्त्र केवळ अंदाज व्यक्त करते जो प्रत्येकावर लागू होईलच असे नाही, पण नातं टिकवण्यासाठी प्रयत्न दोघांनीही करणे गरजेचे असते.
टिप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
