Personality Traits According To The First Letter : ज्योतिषशात्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता. मग ती जन्मतारीख असो किंवा तुमची रास. यातीलच एक पद्धत म्हणजे व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर. अक्षर पाहून तुम्ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊ शकता. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमच्याबद्दल बरेच काही सांगू शकते. अगदी तुमचे भविष्य देखील…
ज्योतिषांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्यांच्या स्वभाव, करिअर, प्रेम जीवन, नशिबाबद्दल अनेक गोष्टी उलघडण्यास मदत करते. त्यामुळे आज आपण ‘H’ या अक्षराने नाव सुरु होणाऱ्या मंडळींबद्दल सांगणार आहोत. असे म्हटले जाते की, ज्या लोकांचे नाव ‘H’ या अक्षराने सुरू होते ते खूप खास असतात आणि नशीब नेहमी त्यांच्या बाजूने असते.
‘H’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या लोकांची वैशिष्ट्ये
भावनिक
‘H’ अक्षराने नाव सुरू होणारी व्यक्ती बाहेरून कठोर दिसतात. पण, आतून खूप हळवे असतात. त्यांचा स्वभाव खूप मृदू असतो. अगदी लहानसहान गोष्टींवरूनही भावुक होतात, कोणाचेही दुःख त्यांना पाहवत नाही आणि इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असतात.
बुद्धिमान
तुमची बुद्धी तल्लख असते. राजासारखे जीवन जगता आणि तुमच्यात नेतृत्वगुण असतात. व्यावसायिक जीवनात अत्यंत शिस्तप्रिय असतात आणि हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण करतात. यामुळेच व्यवसाय किंवा नोकरीमध्ये उच्च पदांवर तुम्ही सहज पोहचू शकता..
भाग्यवान
तुम्हाला भाग्यवान मानले जाते. कारण – तुम्हाला आर्थिक अडचणींचा क्वचितच सामना करावा लागतो. तुमचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय असले तरीही कठोर मेहनत, तल्लख बुद्धी तुम्हाला समाजात मोठी प्रसिद्धी, नाव आणि संपत्ती मिळवून देण्यास मदत करते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंवर भरमसाट खर्च करायला आवडतो.
प्रामाणिक
तुम्ही खूप प्रामाणिक असतात. आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहतात. पण, तुम्हाला पटकन भावना व्यक्त करता येत नाही. एकदा रिलेशनशिपमध्ये आलात की, जोडीदाराला जगातील सर्व सुख देतात.
रागिष्ट
जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तुम्ही कोणाचेही ऐकत नाहीत. मात्र, त्यांचा राग जितक्या लवकर येतो, तितक्याच लवकर शांतही होतो.
