scorecardresearch

Premium

Personality Traits : कसा असतो ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव? वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असतात. आज आपण ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

how is People born in october
कसा असतो ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव? (Photo : Loksatta)

People born in October : अंकशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. ऑक्टोबर हा दिनदर्शिकेनुसार वर्षातील दहावा महिना असतो. या महिन्यात खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू होतो. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असतात. आज आपण ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांचा लकी नंबर १० असतो. हे लोक खूप नशीबवान असतात. आयुष्यात ज्या गोष्टी मनापासून ठरवतात, त्यात ते यशस्वी होतात. या व्यक्ती खूप मेहनती असतात.
  • या लोकांचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असते. ते सहज कोणाचेही मन जिंकू शकतात. लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या लिस्टमध्ये टॉपवर येतील. या व्यक्ती आयुष्यात नेहमी सकारात्मक असतात.
  • या महिन्यात जन्मणारे लोक जर कुणाच्या प्रेमात पडले तर आपले प्रेम टिकवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. मनापासून ते कोणतेही नातं निभवतात, पण अनेकदा या लोकांना योग्य जोडीदार मिळत नाही.

हेही वाचा : Personality Traits : या राशींचे लोक असतात सर्वात जास्त आनंदी, नेहमी असतात सकारात्मक; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

Budh Graha Gochar Bhadra Rajyog Make Diwali In October 2023 These Rashi To Get Vaibhav Dhan Lakshmi Blessing Money
बुध ग्रहाने भद्र राजयोग बनवल्याने ऑक्टोबर महिन्यातच होईल दिवाळी! ‘या’ राशींवर वैभव व धनलक्ष्मी होईल प्रसन्न
Daily Horoscoper 20 September 2023
Daily Horoscope: मीनसाठी दिवस फलदायी तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक मतभेद टाळावेत
online frauds in india DSP Viral VIDEO
“मुलीने निर्वस्त्र होऊन VIDEO कॉल केला अन्…,” सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने थेट DSP ला दाखवला ‘तो’ व्हिडीओ
Daily Horoscoper 15 September 2023
Daily Horoscope: मेषसाठी दिवस अनुकूल तर ‘या’ राशीच्या व्यक्तींचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, पाहा भविष्य
  • या लोकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की, ते क्षणोक्षणी भावूक होतात; पण यांना व्यक्त व्हायला आवडत नाही. ते नेहमी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते कधीही सार्वजनिक ठिकाणी राग किंवा संताप व्यक्त करत नाहीत.
  • या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप प्रामाणिक असतात. त्यांना खोटं बोलणे आवडत नाही. त्या नेहमी खरेपणासाठी लढतात. खूप जास्त स्पष्ट व्यक्तिमत्त्वाच्या असल्यामुळे त्या नेहमी स्पष्ट बोलतात.
  • ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने खूप शांत असतात. त्यांना सतत बडबड करायला आवडत नाही. ते खूप कमी बोलतात. त्यांचा शांत स्वभाव अनेकांना आवडतो. त्यांना विरोधकांपेक्षा मित्र भरपूर असतात.

हेही वाचा : ‘या’ राशीची लोकं देतात पैशाला अधिक महत्त्व, यांच्यासाठी पैसाच सर्वकाही असतो; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

  • त्यांना आयुष्यात नेहमी सकारात्मक राहायला आवडते. त्यामुळे ते कधीही नकारात्मक विचार करत नाहीत आणि त्यांच्याबरोबर नेहमी सकारात्मक गोष्टी घडतात. या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतो. ते नेहमी इतरांना पुढे जाण्यास मदत करतात.
  • या लोकांना वर्तमानात जगायला आवडते. ते भविष्याचा खूप विचार करत नाही. ते परिस्थितीनुसार वागतात, त्यामुळे अनेकदा या स्वभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
  • हे लोक खूप समजूतदार असले तरी पैशांच्या बाबतीत यांचे नियोजन चांगले नसते. ते नेहमी गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करतात. यामुळे अनेकदा यांचे आर्थिक नियोजन बिघडते. या लोकांना पैशांची बचत करता येत नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Personality traits how is people born in october how is thier nature and personality ndj

First published on: 27-09-2023 at 12:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×