Meen November 2026 Horoscope Is Here : राशी चक्रातील सगळ्यात शेवटची रास म्हणजे तुमची रास मीन. तुमच्या राशीचा स्वामी गुरू आहे. गुरू ग्रह हा सद्गुणी, शांत, प्रसन्न, परोपकारी अशा गुणांनी परिपूर्ण असतो. हेच गुरुचे गुण मीन राशीतही आढळून येतात. एकटे राहण्यापेक्षा समूहाबरोबर, गटागटाने राहायला तुम्हाला आवडते. तुम्हाला कोणा ना कोणाचा तरी आधार आवश्यक असतो. पण, एकदा तुमचा पाया भक्कम झाला की, मग तुमचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे फुलू शकते. काहीशी धरसोड वृत्ती तुमच्यात असते त्यामुळे तुमच्यातआत्मविश्वास कमी असतो.
तुमची रास सदा हसतमुख असते. पण, स्वभाव काहीसा चंचल असतो. त्यामुळे काही वेळा आळशीपणादेखील तुमच्यात दिसून येतो. तुमच्यात सारासार विचार करण्याचा शहाणपणा आहे. प्रेम आणि सेवा शुश्रूषा हा तुमचा स्थायी भाव आहे. रुढीप्रिय, कलाप्रिय असणारी तुमची रास काही वेळा महत्वाचे निर्णय स्वतंत्रपणे घेत नाही. मार्गदर्शकाच्या सल्ल्याने तुम्ही उच्च ध्येय गाठू शकता. अशा या मीन राशीला नोव्हेंबर महिना कसा जाईल याबद्दल सोनल चितळेंकडून जाणून घेऊया.
मीन राशीला कसा जाणार नोव्हेंबर महिना?
गुरुचे बल मध्यम असेल. तुम्हाला साडेसातीचा सौम्य प्रभाव जाणवेल. विद्यार्थी वर्गाची मनस्थिती द्विधा होईल. अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक व्यवधाने सांभाळाल. सामाजिक उपक्रमात रस घ्याल. उच्च शिक्षणासाठी, परदेश गमनासाठी विशेष मेहनत घ्याल. नोकरी व्यवसायातील टप्पे सहन करत पुढे जात राहाल. वरिष्ठांचे पाठबळ कामी येईल.
विवाहित दांपत्यांनी विनाकारण वाद घालू नये. दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी नाती जपाल. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घ्यावी. शाश्वत मिळकत सुरू राहील असा पर्याय निवडाल. घर, बंगला, जमीन, शेती याबाबतच्या व्यवहाराची बोलणी होतील. कामानिमित्त थोडा फार प्रवास कराल. थंड, उष्ण हवामानाचा प्रकृतीवर परिणाम होईल. २५ नोव्हेंबरला राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
असा मीन राशीचा नोव्हेंबर महिना असणार आहे…
