Pisces Yearly Horoscope 2024 : मीन राशीचा स्वामी गुरू आहे. गुरू हा सद्गुणी, शांत, प्रसन्न, परोपकारी अशा गुणांनी परिपूर्ण असलेला ग्रह आहे. तसेच गुरुच्या मीन राशीतही हे गुण आढळतात. एकटे राहण्यापेक्षा समूहाबरोबर, गटागटाने राहायला त्यांना आवडते. मीन राशीच्या व्यक्ती पापभिरू असतात. त्यांना कोणा ना कोणाचा तरी आधार आवश्यक असतो. एकदा त्यांचा पाया भक्कम झाला की, मग त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे फुलू शकते. काहीशी धरसोड वृत्ती असलेल्या मीन राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो. अशा या मीन राशीच्या व्यक्तींना २०२४ हे वर्ष कसे जाईल याचा हा आढावा.

यंदा पूर्ण वर्षभर शनी व्ययस्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करेल. आपल्या साडेसातीचा हा पहिला टप्पा सुरू आहे. अडीअडचणी पार करत पुढे जावे लागेल. एप्रिल अखेरपर्यंत गुरू द्वितीय स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. गुरुबल चांगले असेल. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. १ मे रोजी गुरू तृतीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. हा राशीबदल देखील हितकारक असेल. पूर्ण वर्षभर राहू आणि नेपच्यून आपल्या मीन राशीतून भ्रमण करतील. समज- गैरसमज पसरतील. भावनिक समतोल साधणे आवश्यक ठरेल. केतू सप्तम स्थानातील कन्या राशीतून वर्षभर भ्रमण करेल. कोणताही करार करताना अधिक खबरदारी घ्यावी लागेल. मे अखेरीपर्यंत हर्षल द्वितीय स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. तर १ जूनला तृतीयातील वृषभ राशीत प्रवेश करेल. कोणाला शब्द दिलात तर तो पाळणे ही आपली जबाबदारी आहे याचा विसर पडू देऊ नका. अन्यथा कोणाला काही आश्वासन देऊ नका. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या बदलांचा विचार आणि अभ्यास करता मीन राशीला २०२४ या वर्षातील वार्षिक राशीफल कसे असेल हे पाहूया.

1st_May_Horoscope: Daily Marathi Horoscope Money Astrology Today
१ मे पंचांग: श्रवण नक्षत्रात गुरुचा राशी बदल; मेष ते मीनपैकी कुणाच्या महिन्याची सुरुवात होईल गोड?
Weekly Horoscope in Marathi
Weekly horoscope: ६ मेपासून सुरु होणार राशींचा सुवर्णकाळ! मिळेल बक्कळ पैसा, कसा जाईल तुमचा आठवडा?
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
7th May Panchang Amavasya Mesh To Meen Horoscope
७ मे पंचांग: मिथुन व कन्या राशीला लाभ; वृषभ राशीचे आयुष्य ‘असं’ बदलणार, अमावास्येला तुमच्या राशीच्या नशिबात काय?
Venus Transit 2024
Shukra Gochar: या राशींचे सुरू झाले कठीण दिवस, उत्पन्नावर दिसून येईल दुष्परिणाम; जाणून घ्या, त्या राशी कोणत्या?
Shani Nakshatra Parivartan May 2024
शनी देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाचा ‘या’ तीन राशींना होणार मोठा फायदा
Vinayak Chaturthi 11th May Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya
११ मे पंचांग: गणपती बाप्पा ‘या’ राशींच्या निद्रिस्त नशिब करणार जागं; विनायकी चतुर्थी विशेष १२ राशींचं भविष्य वाचा
Sagittarius Yearly Horoscope 2024
Sagittarius Yearly Horoscope 2024 : धनु राशीच्या लोकांचे २०२४ हे वर्ष कसे जाईल? कोणत्या महिन्यात चमकेल भाग्य? जाणून घ्या…

फेब्रुवारी :

काही निर्णय घेताना मनात वैचारिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. लाभ स्थानातील उच्चीचा मंगळ यातून आपणास योग्य मार्ग दाखवेल. नोकरी व्यवसायात आपली मते ठामपणे मांडलीत तरच आपल्या मतांचा विचार केला जाईल. अन्यथा त्यांचा प्रभाव पडणार नाही. विद्यार्थी वर्गाने हिंमत एकवटून परीक्षेला सामोरे जावे. सराव, उजळणी अत्यंत महत्त्वाची आहे. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जीवनसाथी मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या गुणांची कदर करावी. जोडीदाराची साथ मिळाल्याने मोठ्या अडचणींवर देखील सहजपणे मात करू शकाल. या महिन्यात घर, प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. हाडे, मणका आणि रक्ताभिसरण संस्था यांसंबंधीत तक्रारी वाढतील.

मार्च :

महिन्याचा पूर्वार्ध फार चांगला जाईल. महत्वाच्या कामात यश मिळेल. काही निर्णय लांबणीवर पडले तरी ते हितावह ठरतील. विद्यार्थी वर्गासाठी हा परीक्षेचा काळ अतिशय महत्वाचा असेल. मन चंचल होईल. पण घाबरू नका. आधी घेतलेल्या मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कार्यप्रणाली मध्ये झालेले बदल अंगिकारायला वेळ लागेल. व्यवसायात हिरीरीने निर्णय घ्याल. व्यवसाय वृद्धीसाठी भविष्यात हे निर्णय लाभकारक ठरणार आहेत. गुंतवणूकदारांना योग्य परतावा मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढेल. आर्थिक परिस्थिती उंचावेल. विश्वसनीय व्यक्तींपाशीच घराच्या बाबत बोलणी करावीत. आपल्या चांगुलपणाचा इतर लोक लाभ उठवतील. सावधान! व्यवहारात भावनिक गुंतागुंत नको.

एप्रिल :

नव्या आर्थिक वर्षात खूप महत्वाच्या उलाढाली होतील. आपला आत्मविश्वास वाढेल. हिमतीने पुढाकार घ्याल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. मेहनत, अभ्यास आणि सातत्य यामुळेच हे शक्य होईल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे लक्षात घ्यावेत. ‘आपण चांगले म्हणून सगळे जग चांगले’ असे नसते, सतर्क राहा. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील. मनपसंत जोडीदाराची निवड कराल. विवाहित दाम्पत्यांमध्ये समज, गैरसमज वाढतील. आपले म्हणणे शांतपणे आणि स्पष्टपणे जोडीदारापुढे मांडावे. फक्त गप्प राहून भागणार नाही, व्यक्त व्हावे. २५ एप्रिलपर्यंत घर, प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी. घसा, डोळे आणि डोके यांची दुखणी मागे लागतील.

हेही वाचा – फेब्रुवारीत ‘या’ तारखांना वाढदिवस असणाऱ्यांचे नशीब फळफळणार; मोठा धनलाभ होताना काय जपावं लागेल?

मे :

१ मे रोजी गुरू तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल, आपणास मध्यम गुरुबल असेल. कामातील अडचणी भरपूर मेहनत घेऊन दूर करव्या लागतील. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी परदेशगमन योग येईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा यांचा गंभीरपणे विचार केलात तरच आपला टिकाव लागेल. नोकरी व्यवसायात हितशत्रूंच्या त्रासाला कंटाळून जाल. पण थोडे धीराने घ्यावे. कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान आपल्याला परवडणारे नाही. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन कार्य सुरू ठेवावे. ओळखीतून स्थळ मिळेल. विवाहितांना कौटुंबिक समस्या उदभवतील. नाजूक प्रश्न हळूवारपणेच हाताळले पाहिजेत. घराच्या बाबतीत योग्य निर्णय घ्याल. ताण तणावामुळे पित्त विकार वाढेल.

जून :

१ जूनला हर्षल तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल. आपल्यातील धाडस वाढेल. नवे करार करताना नियम अटी, छुप्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करावा. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात नवा जोश येईल. अभ्यासातील शंका वेळच्या वेळी दूर कराव्यात. पालक, शिक्षक, मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभे आहेत. नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तींची गाठभेट होईल. भावी जीवनात याचा लाभ होईल. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन चांगले असेल. एकमेकांच्या साथीने महत्वाचे निर्णय घ्याल. घराच्या, मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी. कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण कराव्यात. खांदे, दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे.

जुलै :

निडरपणे आगेकूच केलीत तरच या परिस्थितीत आपला निभाव लागेल. अन्यथा आपली दखल सुद्धा घेतली जाणार नाही. विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढणे महत्त्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य आणि ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर यश आपलेच आहे. नोकरी व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. या संधीचे सोने कराल. मित्रमंडळींची उत्तम साथ मिळेल. कर्तृत्वाला नवी झळाळी येईल. विवाहोत्सुक मंडळींनी स्थळाची योग्य चौकशी करावी. घर, मालमत्तेच्या संदर्भात कायदेपंडितांकडून सल्ला घ्यावा. गुंतवणूकदारांच्या अभ्यासपूर्वक मेहनतीचे फळ चांगले मिळेल. घसा, स्वरयंत्र ,फुप्फुसे यांच्या कार्यात बिघाड होईल.

ऑगस्ट :

मनातील विचारांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. अन्यथा ते चुकीच्या मार्गावर भरकटत जातील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासातील एकाग्रता कायम टिकवावी. लहान मोठ्या परीक्षा चांगल्याप्रकारे निभावून न्याल. नोकरी व्यवसायात अनपेक्षित घटना घडतील. गोंधळून जाऊ नका. धीर धरा. ग्रहबलामुळे परिस्थितीतून मार्ग काढता येईल. विवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदारीसह मोठी आर्थिक जबाबदारी पेलावी लागेल. प्रॉपर्टीच्या
कागदपत्रांची योग्य ती शहानिशा करून घ्यावी. सरकार दरबारी विलंब होण्याची, अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. छाती, पोट, ओटीपोट यांचे त्रास अंगावर काढू नका. आवश्यक ती चाचणी करून घ्यावी.

सप्टेंबर :

अनाकलनीय गोष्टी अनपेक्षितरित्या घडतील. फार विचार न करता त्याच्या शुभ परिणामाचा अनुभव घ्यावा. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. अभ्यासातील पळवाटा शोधू नका. नोकरी व्यवसायातील ज्येष्ठ मंडळींचा पाठिंबा मिळाल्याने कामातील हुरूप वाढेल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींचे ओळखीतून विवाह जुळतील. विवाहितांच्या समस्यांची उत्तरे दोघे मिळून शोधाल. प्रेमबंध दृढ
होतील. मालमत्तेसंबंधीत नियम, कायदे यांची अभ्यासपूर्वक माहिती मिळवाल. या संबंधीत कामे मार्गी लावाल. गुंतवणूकदारांना मर्यादित लाभ होईल. अति अपेक्षा ठेवू नका. तळपाय आणि डोळ्यांचे त्रास बळावतील. वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ऑक्टोबर

हातचे सोडून पळत्यापाठी धावलात तर हाती काहीच लागणार नाही. त्यापेक्षा जे हातात आहे तेच चांगले राखावे. साडेसातीचा प्रभाव जाणवेल. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासातील सातत्य आणि एकाग्रता राखणे हे मात्र सर्वस्वी आपल्या हातात आहे. नोकरी व्यवसायातील काही बदल स्वीकारावे लागतील. कामाच्या पद्धतीमध्ये योग्य असा बदल करणे भाग पडेल. विवाहोत्सुक मुलामुलींना साजेसा जोडीदार मिळेल. विवाहित मंडळींनी शब्द जपून वापरावेत. शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जाईल. घर, मालमत्ता या संबंधातील सरकारी कामे रखडतील. अयोग्य मार्गाने जाणे उचित नाही. गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा मिळेल.

नोव्हेंबर :

नातेवाईक, भावंडे, मित्र मंडळी यांना मदत करण्याची संधी मिळेल. निर्माण झालेले प्रश्न झटपट सुटणार नाहीत हे ध्यानात असू द्यावे. नोकरी व्यवसायात प्रतिस्पर्धी परिस्थितीचा लाभ उठवतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागेल. विद्यार्थी वर्गाने अधिक मेहनत घ्यावी. चित्त विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आसपास आहेत. यावर मात करून स्वतःला सिद्ध करण्याचा हा चांगला मोका आहे. विवाहित मंडळींना जोडीदारासह चांगला वेळ व्यतीत करता येईल. मोकळेपणाने बोलल्याने लहानमोठे प्रश्न सुटतील. गुंतवणूकदारांना अधिक फायदा मिळेल. आपली मर्यादा मात्र ओलांडू नका. अन्यथा धोका संभवतो. मूत्रविकार बळावल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

हेही वाचा – तब्बल १० वर्षांनी कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सुर्य ग्रहाची होणार युती; ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळेल भरपूर पैसा

डिसेंबर :

२०२४ चा शेवटचा महिना. या महिन्यात गुरुबल कामी येईल. साडेसातीचा प्रभाव कमी असेल. कामे गतिमान नसली तरीही पुढे सरकत राहतील. विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाण येईल. अभ्यास, मेहनत, सराव याकड गांभीर्याने बघाल. नोकरी व्यवसायात सगळी हिंमत एकवटाल. रवीच्या साहाय्याने प्रभावीपणे आपले मुद्दे मांडाल. कला, क्रीडा यात प्राविण्य मिळवाल. विवाहित मंडळींना जोडीदाराची साथ भाग्यकारक ठरेल. समज, गैरसमज दूर होतील. गुंतवणूकदारांना नव्या संधी उपलब्ध होतील. हवामानातील विचित्र बदल प्रकृतीवर परिणाम करेल. अस्वस्थता वाढेल.

एकंदरीत २०२४ या वर्षात साडेसातीमुळे कामे रखडली तरी मध्यम गुरुबल असल्याने कामकाज ठप्प होणार नाही. विद्यार्थ्यांना मेहनातीशिवाय पर्याय नाही. विवाहोत्सुक मंडळींनी संशोधन कार्य सुरू ठेवावे. विवाहित मंडळींनी एकमेकांना समजून घ्यावे. आरोग्याची योग्य वेळी काळजी घेतल्यास आणि गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगल्यास २०२४ हे वर्ष आपणास उत्कर्षकारक जाईल.