Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील १५ दिवस विशेष मानले जातात, त्यांना पितृ पक्ष म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो.अशी मान्यता आहे. पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वाद देतात. त्याच वेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवस चालते. यंदा पितृ पक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील?

पितृ पक्ष २०२४ तारीख (Pitru Paksha 2024 Date)

पितृ पक्ष भाद्रपद महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीपर्यंत राहतो. पितृपक्ष १७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. २ ऑक्टोबर २०२४ रोजी समाप्लत होईल.

हेही वाचा – September 2024 Festival List : गौरी-गणपतीच्या आगमनासह सप्टेंबर महिन्यात येणार हे सण-उत्सव, येथे पाहा संपूर्ण यादी

पित पृक्ष २०२४ श्राद्ध तिथी (Pitru Paksha 2024 Tithi)

  • १७ सप्टेंबर २०२४, मंगळवार- पितृपक्ष प्रारंभ, प्रोष्ठप्रदी पोर्णिमा
  • १८ सप्टेंबर२०२४, बुधवार – प्रतिपदा श्राद्ध,
  • १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार- द्वितीया श्राद्ध
  • २० सप्टेंबर २०२४, शुक्रवार – तृतीया श्राद्ध
  • २१ सप्टेंबर २०२४, शनिवार, चतुर्थी श्राद्ध- भरणी श्राद्ध,
  • २२सप्टेंबर २०२४, रविवार – पंचमी श्राद्ध, षष्ठी श्राद्ध
  • २३सप्टेंबर २०२४- सोमवार – सप्तमी श्राद्ध
  • २४ सप्टेंबर २०२४- मंगळवार अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध
  • २५ सप्टेंबर २०२४, बुधवार -नवमी नवमी श्राद्ध,
  • २६ सप्टेंबर २०२४, गुरुवार – दशमी श्राद्ध,
  • २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार – एकादशी श्राद्ध
  • २९ सप्टेंबर २०२४, रविवार- द्वादशी श्राद्ध, माघ श्राद्ध,
  • ३० सप्टेंबर २०२४, सोमवार – त्रयोदशी त्रयोदशी श्राद्ध,

हेही वाचा – पितृपक्षात कन्या राशीतून तूळ राशीमध्ये येणार शुक्र! एक दोन नव्हे तर चक्क १० राशींना धनलाभाचा योग

ऑक्टोबर महिन्यात पितृपक्ष समाप्त होणार

  • १ ऑक्टोबर २०२४- मगंळवार -चतुर्दशी श्राद्ध
  • २ अक्टूबर २०२४ बुधवार- सर्वपितृ अमावस्या

श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती? (What is the right time to do Shraddha Karma?)

शास्त्रानुसार सकाळ-संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी १२ वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले गेले आहे. यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात.

श्राद्ध करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो. यावेळी केवळ कावळे, मुंग्या, गाय, देव आणि कुत्र्यांना अर्पण करावे आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करावे असे सांगितले जाते.