Pitru Paksha 2026 Timetable Shradh Tithi : हिंदू परंपरेनुसार पितृपक्षादरम्यान पूर्वजांची पूजा केली जाते. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध, पिंडदान, तर्पण आणि दानधर्म करण्याची पद्धत आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील पूर्णिमा तिथीपासून श्राद्धं सुरू होतात आणि आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीपर्यंत ती चालतात.

गणपतीनंतर आणि नवरात्रीच्या आधी पितर आणि पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांती पूजेसाठी वर्षातील हे मधले १५ दिवस विशेष मानले जातात,

यंदा वर्ष २०२६ मध्ये पितृपक्षाची सुरुवात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाईल. २०२६ मध्ये पितृ पक्ष २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदा पितृ पक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील….

पितृ पक्ष २०२६ कधीपासून सुरू होतोय?

यंदा पितृ पक्ष रविवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजीपासून रात्री १० वाजून १८ मिनिटांनी सुरू होत असून, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सर्वपितृ अमावास्येला समाप्त होईल.

पितृ पक्ष २०२६ श्राद्धाच्या तारखा (Pitru Paksha 2026 Dates)

२६ सप्टेंबर (शनिवार): भाद्रपद पूर्णिमा श्राद्ध

२७ सप्टेंबर (रविवार): प्रतिपदा श्राद्ध

२८ सप्टेंबर (सोमवार): द्वितीया श्राद्ध

२९ सप्टेंबर (मंगळवार): तृतीया श्राद्ध, महाभरणी

३० सप्टेंबर (बुधवार): चतुर्थी व पंचमी श्राद्ध

१ ऑक्टोबर (गुरुवार): षष्ठी श्राद्ध

२ ऑक्टोबर (शुक्रवार): सप्तमी श्राद्ध

३ ऑक्टोबर (शनिवार): अष्टमी श्राद्ध

४ ऑक्टोबर (रविवार): नवमी श्राद्ध (मातृ नवमी)

५ ऑक्टोबर (सोमवार): दशमी श्राद्ध

६ ऑक्टोबर (मंगळवार): एकादशी श्राद्ध

७ ऑक्टोबर (बुधवार): द्वादशी श्राद्ध

८ ऑक्टोबर (गुरुवार): त्रयोदशी श्राद्ध

९ ऑक्टोबर (शुक्रवार): चतुर्दशी श्राद्ध

१० ऑक्टोबर (शनिवार): सर्वपित्री अमावास्या श्राद्ध

पितरांचे श्राद्ध कोणत्या दिवशी करावे?

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, पूर्वजांचे निधन ज्या तिथीला झाले आहे, त्याच तिथीला त्यांचे श्राद्ध केले पाहिजे. म्हणजेच प्रतिपदेला निधन झाले असल्यास प्रतिपदेच्या दिवशी, द्वितीयेला झाले असल्यास द्वितीयेच्या दिवशी श्राद्ध करणे योग्य मानले जाते.

मातृ पितरांच्या (आई आणि स्त्री पूर्वज) आत्म्यांच्या शांतीसाठी नवमी तिथीचे श्राद्ध अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या तिथीला ‘मातृ नवमी’. असेही म्हणतात. ज्यांच्या निधनाची तिथी माहिती नसेल, त्यांचे श्राद्ध सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी केले जाते. सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध केल्याने सर्व पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. वर्ष २०२६ मध्ये चतुर्थी आणि पंचमी तिथीचे श्राद्ध एकाच दिवशी म्हणजे ३० सप्टेंबरला येत आहे.