October 2026 Capricorn Horoscope : मकर ही शनीची रास आहे. शनीचे बरेच गुणधर्म जसे की, चिकाटी, मेहनती, सोशिकपणा, गंभीर प्रवृत्ती तुमच्यात पाहायला मिळतात. जुन्या मतांना धरून राहणे तुम्हाला आवडते. सेवा-शुश्रूषा करण्यात तुम्ही सदैव तत्पर असता. जिद्दीने, चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय तुमच्या मनाला निश्चिंती मिळत नाही. त्यामुळे तुम्ही खूप मेहनत घेणाऱ्या असतात. तासन् तास कष्ट घेण्याची तुमची तयारी असते. आपल्या सुखापेक्षा त्यांना इतरांना सुख देण्यात अधिक आनंद मिळतो.
पण, याचबरोबर नैराश्य, उदासीनतेने तुम्ही लवकर ग्रासून जाता. पण, जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी नेहमीच धडपड करत असता. भरपूर संयम तुमच्या ठायी असतो. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ असे तुमच्या जीवनाचे तत्व असते. अशा या दीर्घ काळ विचार करणाऱ्या आणि कधी कधी संशय, शंका घेणाऱ्या तुमच्या या मकर राशीला ऑक्टोबर महिना कसा जाईल चितळेंकडून जाणून घेऊ.
मकर राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशिभविष्य
पितृपक्षानिमित्त समाजसेवा, दानधर्म कराल. घटस्थापना आणि दसरा या दिवशी भाग्याचे दरवाजे उघडतील. विद्यार्थी वर्ग कसून मेहनत घेईल. जिद्द आणि चिकाटी वाखाण्याजोगी असेल. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक घटना घडतील. सहकारी वर्गाची मदत मिळेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जुळतील. चांगला जीवनसाथी मिळेल. विवाहितांचे आर्थिक आराखडे खरे ठरतील.
भविष्याचे नियोजन उत्तम प्रकारे कराल. गुंतवणुकीचा भरघोस परतावा मिळेल. फसव्या योजनांपासून स्वतः तर दूर राहालच; पण इतरांनाही सावध कराल. जागेच्या व्यवहारात हळूहळू प्रगती होईल. ओळखीच्या व्यक्तींमार्फत काम पुढे जाईल. वायुप्रदूषण आणि सतत बदलत्या तापमानामुळे श्वसनाचे आजार बळावतील. ३१ ऑक्टोबरला गुरू अष्टमातील सिंह राशीत प्रवेश करेल.
तर असा मकर राशीचा ऑक्टोबर महिना असेल.
