scorecardresearch

Premium

३० वर्षांनी पितृपक्षात अमृत व सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने ‘या’ ५ राशींना लाभणार वाडवडिलांची कृपा; होऊ शकता श्रीमंत

Pitru Paksh 2023: यंदा आजपासून म्हणजेच २९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्ष सुरु होणार आहे. तर नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपणार आहे.

Pitru Paksha In Amrut Sarvarth Siddhi Yog After 30 Years These Five Zodiac Signs To Be Wealthy Rich By Ancestors Money Astro
पितृपक्षात 'या' ५ राशींना कोणत्या रूपात धनलाभ होऊ शकतो पाहा.. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pitru Paksha 2023 Shradhha: धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध काळ सुमारे १६ दिवस असतो. यंदा आजपासून म्हणजेच २९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्ष सुरु होणार आहे. तर नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सुद्धा लागणार आहे. ज्योतिषानुसार, पितृ पक्षाच्या १५ दिवसातील ग्रह- नक्षत्रांची स्थिती ही विशेष असणार आहे. ३० वर्षांनी पहिल्यांदाच या पंधरवड्यात सर्वार्थ सिद्धी योग व अमृत सिद्धी योग तयार होणार आहे. या दोन्ही शुभ योगाच्या प्रभावाने पितृ पक्षात काही राशींच्या भाग्याला कलाटणी मिळणार असून प्रचंड धनप्राप्तीची संधी आहे. यंदाचा पितृपक्ष नक्की कोणत्या राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे हे पाहूया..

पितृपक्षात ‘या’ ५ राशींना कोणत्या रूपात धनलाभ होऊ शकतो पाहा..

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीला पितृ पक्षात आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. मुख्यतः तुमचे उधार दिलेले पैसे परत मिळून धनलाभ होऊ शकतात. व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला नवनवीन लोकांशी संपर्क साधता येईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. घरी तुमच्या मताला किंमत मिळेल अशी एखादी घटना घडू शकते.

Shani Nakshatra Parivartan
सूर्यग्रहणानंतर शनिदेव नक्षत्र परिवर्तन करताच ‘या’ राशींना भरभरून मिळणार पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने येऊ शकतात ‘अच्छे दिन’
Pitru Paksh Ashtami Sarvarth Siddhi Shiv Yog On 6th and 8th october Mahalakshmi To Give Five Rashi More Money Health Astro
पितृपक्ष अष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग! ‘या’ 5 राशींना लाभणार पूर्वजांची कृपा; प्रचंड श्रीमंतीसह दार ठोठावणार लक्ष्मी
celestial events in the month of October
ऑक्टोबर महिन्यात खगोलीय घटनांची रेलचेल; आकाशप्रेमींसाठी पर्वणी…
transit, october grah gochar 2023,
ऑक्टोबरमध्ये शुक्र-सूर्य, राहू-केतूसह ६ ग्रहांच्या चालीत बदल होताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

मिथुन राशीसाठी येणारा १५ दिवसांचा कालावधी नोकरी- व्यवसायासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आर्थिक लाभ मिळाल्याने यंदाची दिवाळी तुम्ही अगदी जोशात साजरी करू शकता. वाडवडिलांच्या जमिनीच्या रूपात तुम्हाला धनलाभाचे योग आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

कर्क राशीच्या मंडळींना ऑक्टोबरच्या दोन्ही आठवड्यांमध्ये प्रगतीची संधी आहे. नोकरदार मंडळींना प्रलंबित पगारवाढ किंवा बोनसच्या स्वरूपात धनलाभ होऊ शकतो. समाजातील आपले स्थान मजबूत होऊ शकते. तुमच्या नशिबात बदलाचे संकेत आहेत.

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

कन्या राशीला केवळ पितृपक्षच नव्हे तर ऑक्टोबरचा संपूर्ण महिना हा सोन्याहून पिवळा सुखाचा काळ घेऊन येणारा असू शकतो. तुम्ही वैवाहिक आयुष्यात सुख व शांती अनुभवू शकता, आणि मुख्यतः जोडीदाराच्या रूपातच धनलाभाची चिन्हे आहेत. कौटुंबिक सुखाने भारावून टाकणारा असा हा कालावधी असणार आहे.

हे ही वाचा<< शनीदेव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करणार नक्षत्र बदल; २४ दिवसांनी ‘या’ राशींचे अच्छे दिन होणार सुरु, लाभेल धन

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

कुंभ राशीला या कालावधीत जुन्या त्रास व प्रश्नांपासून मुक्ती मिळू शकते. ताण- तणाव दूर होईल व कर्माचे फळ मिळू शकते. तुमच्या मेहनतीला योग्य तो मोबदला मिळवून देणारा असा हा कालावधी आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. घरी शांततेचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pitru paksha in amrut sarvarth siddhi yog after 30 years these five zodiac signs to be wealthy rich by ancestors money astro svs

First published on: 29-09-2023 at 10:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×