Pitru Paksha Horoscope: २७ सप्टेंबर २०२६ रोजी पितृ पक्षाचा पहिला दिवस असेल. या दिवशी प्रतिपदा श्राद्ध केले जाईल. त्याच दिवशी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. सूर्यदेव हस्त नक्षत्रात प्रवेश करतील आणि जवळपास १४ दिवस याच नक्षत्रात राहतील.

जेव्हा सूर्य किंवा इतर कोणताही ग्रह राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळा होतो. ज्योतिषांच्या मते, सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन या ३ राशींसाठी शुभ ठरणार नाही. या राशींच्या लोकांनी पुढील काही दिवस सावध राहणे गरजेचे आहे.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणे टाळावे. सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे करिअरमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. तसेच मिथुन राशीच्या व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना घाई करू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तणाव कमी घेण्याचा प्रयत्न करा.

कन्या राशी (Virgo Horoscope)

सूर्याच्या नक्षत्र गोचराचा परिणाम कन्या राशीच्या स्वभावावर होऊ शकतो. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो आणि त्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते.

मीन राशी (Pisces Horoscope)

सूर्याचे हस्त नक्षत्रात जाणे मीन राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. वैवाहिक जीवनात गैरसमज वाढू शकतात आणि आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)