scorecardresearch

PM Modi Astrology: नरेंद्र मोदी यांना २०२३ मध्ये किती व काय अडचणी येणार? जाणून घ्या पंतप्रधानांचं राशीभविष्य

PM Narendra Modi Zodiac Sign Yearly Horoscope: २०२३ मध्ये मोदी पाकिस्तान-चीनसह संबंध सुधारू शकतील का? येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींना भाजपाचा विजयी गड राखता येणार का यावर ज्योतिषतज्ञ उदयराज साने यांचे सविस्तर विश्लेषण वाचा..

PM Narendra Modi Zodiac Sign Yearly Horoscope
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२३ राशीभविष्य (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

-उदयराज साने

Prime Minister Narendra Modi Astrology: जगात सर्वत्र युद्धाचे वारे जोरदार वाहत आहेत. हवामानातील मोठ्या बदलाच्या घटनांना जग सामोरे जात आहे. भारतात २०२३ मध्ये महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होत असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याचसाठी आपण फलज्योतिषाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींची कुंडली तपासणार आहोत. ‘डेनीबोला’ ताऱ्या जवळील शनी मुळे त्यांची दांडगी निर्णय क्षमता सर्वांनाच या दहा वर्षात दिसून आलेली आहे.

गुरु- चंद्राचा नवपंचम योग घेऊनच ३० मे २०१९ ला नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यात प्रामुख्याने शनी-मंगळाचा अन्योन्य योग नवमांशात होता. त्यामुळे अनेक कालबाह्य कायदे रद्द केले तसेच सत्तेवर येताच लगेचच दोन महिन्यानंतर म्हणजे दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरचे ३७०/ ३५ ए हे कलम त्यांनी हटवले. सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात सरकारला संपूर्ण यश मिळालेले नसले, तरी तिथे सुरू असलेला मोठा हिंसाचार कमी झालेला आहे. तिथल्या निवडणुका सुद्धा त्यांनी यशस्वीपणे पार पाडून दाखवल्या आहेत. ‘सेजिनस’ ताऱ्याजवळ असलेला नेपच्यून, म्हणून त्यांचा ध्येयवाद जगाला दिसून आला आहे.

२०२३ मध्ये मोदी पाकिस्तान-चीनसह संबंध कसे हाताळतील?

केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर चीनला सुद्धा जशास तसे उत्तर आपण दिलं, यात त्यांची अंत:स्फूर्ती वारंवार दिसून आली. सांप्रत मीन राशीतून होणारे गुरूचे भ्रमण त्यांच्या पंचमातून होत असल्याने, त्यांच्या हातून आणखी चांगली कामगिरी घडण्याची शक्यता आहे. या वर्षात अनेक महत्त्वाच्या राज्यात निवडणुका होत असल्याने, त्यात पुन्हा एकदा ग्रह त्यांची परीक्षा घेणार आहेत. २१ एप्रिल नंतरच्या सर्व निवडणुकात पंतप्रधान मोदींना विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. आगामी कालखंडात गोचर शनि भ्रमण कुंभ राशीतूनच होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या चतुर्थातून हे शनी भ्रमण होणार आहे. २०२३ च्या वर्ष अखेरीस चंद्राच्या केंद्रात हा गोचर शनि राहणार आहे, त्यामुळे त्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच काही निर्णयात फेरबदल करावे लागणार आहेत.

नव्या वर्षात २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२३ या काळात त्यांच्या कष्टात अधिक भर पडणार आहे. २८ नोव्हेंबरला गोचर राहू मीन राशीत प्रवेश करतो. गोचर राहूचे भ्रमण पंतप्रधानांच्या कुंडलीतन पंचमातून होत आहे. २०२४ च्या निवडणुका नेटकेपणाने पार पडण्यासाठी मुस्लिम समाजाचं सहकार्य मिळवावं लागणार असल्याचं दिसून आल्यानेच, नुकतेच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सभेत मुस्लिम समाजाला तोडू नका, तर जोडा असा नारा देण्यात आला. याच ‘सेजिनस’ तार्‍याजवळील असलेल्या नेपचूनच्या अंत: स्फूर्तीचा हा दाखला होय.

२०२३ मध्ये रोजगाराच्या समस्या मोदी सोडवू शकतील का?

२०२४ च्या लोकसभा निवडणुका या १५ मार्च नंतरच होतील हे गृहीत धरले, तर मेषेतील गुरुच्या साहाय्याने व महत्त्वाच्या धोरणात आमूलाग्र बदल केल्यास निवडणुका जिंकणं अशक्य नाही, असं दिसतं. यातून पुन्हा एकदा जगाला त्यांच्या निर्णयाक्षमतेची जशी प्रचिती येणार आहे तसेच त्यांची ध्येया सक्ती व प्रचंड परिश्रम घेण्याची क्षमता सुद्धा दिसून येईल. १७ जानेवारी २०२३ ला बदललेला शनि हा कुंभ राशी मध्ये नव्या वर्षात फक्त आठ अंश इतकाच जात आहे, म्हणजेच धनिष्ठा नक्षत्रातील पहिल्या दोन चरणा नंतर शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणापर्यंत जाणार आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत दशम स्थानात शनि-शुक्र आहेत. त्यामुळे आत्मनिर्भरतेच्या प्रकल्पांना ते निधीची कमतरता कधीच भासू देणार नाहीत. यामुळेच नवीन रोजगारनिर्मितीही होऊ शकते. स्वर्गीय इंदिरा गांधींनी सुद्धा हा आत्मनिर्भरतेचा नारा दिला होता, पण त्यांनी लोकांना निधी उपलब्ध करून दिला नाही.

नरेंद्र मोदी यांनी भारताचा व्यापार व निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला, त्याचं कारण म्हणजे त्यांच्या दशम स्थानातील शनि व वर्गोत्तम शुक्र हेच आहेत. लाभातील’ रवी-बुध या शनी शुक्राला मदत करणारे आहेत. गोचर शनि, धनिष्ठा नक्षत्रातून पुढे वाटचाल करत राहणार आहे. या नक्षत्राचे पुराणोक्त वर्णनच मुळी धनावर बसलेली ती धनिष्ठा असे असल्याने, जगभर अर्थव्यवस्था कोसळत असली तरी भारतातातील अर्थव्यवस्था मात्र आता चांगले बाळसे धरू लागली आहे.

हे ही वाचा<< Tarot Card Reading: २०२३ मध्ये तुमच्या राशीला धनलाभ कधी? टॅरो कार्डस् तज्ज्ञ जयंती अलूरकर यांच्याकडून जाणून घ्या

जगभरातील मंदीचा मोदींवर काय परिणाम होणार?

जगात मंदीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत, भारतात देखील ही मंदी येईल. त्या काळातच नव्या वर्षातील परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे. जून ते नोव्हेंबरच्या शेवटास होत असलेला राहू-प्लुटो केंद्रयोग, निसर्ग कुंडलीच्या लग्न दशमस्थानातून हा योग होत असल्याने जगभर मंदी जोर पकडणार आहे, त्याचे पडसाद भारतात सुद्धा नक्कीच उमटणार आहेत. यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरगुंडी होऊ शकते, पण मेषेतील गुरुचे सहाय्य त्याची तीव्रता कमी करण्यासाठी नक्कीच मदतीस येईल.

हे ही वाचा<< Sagittarius Yearly Horoscope 2023: लक्ष्मीकृपेने धनु रास कधी होणार श्रीमंत? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

गुजरातसह राज्यांच्या निवडणुकीत काय होणार?

२०२३ वर्षात अनेक महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने या मंदीचा तेथील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. मोदींच्या कुंडलीत तृतीय व षष्ट स्थानातून हा योग होत असल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याबरोबरच विघातक शक्तींपासून स्वतःला दूर ठेवावयास हवे. जगभर दंड सत्तांचे लोकसत्तेला आव्हान मिळत असताना, भारतापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना, विशेषतः बेरोजगारी-वाढती लोकसंख्या-देशाचे संरक्षण या प्रमुख मुद्द्यांमधून सरकारला वाट काढावी लागणार आहे. या समस्येवरील उपाय योजना आणि याचे समाधानकारक उत्तर आज मितीस कुणाकडेही नाही.

हे ही वाचा<< Tarot Card: २०२३ मध्ये ‘या’ राशीच्या महिला करतील राज्य! लक्ष्मीची साथ लाभून मिळेल बक्कळ पैसे कमावण्याची संधी

२०२४ मध्ये भाजपाचा गड नरेंद्र मोदींना राखता येणार?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असले, तरी या प्रश्नांना भिडणारी कार्यप्रणाली इतर राजकीय पक्षांकडे नसल्याने, या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आले आहे. या प्रश्नांना थेट सामोरे जाण्यासाठी म्हणूनच सर्वांचे एकत्रिकरण करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांना भावल्याने त्यांनी २०२४ साठी पक्षाच्या व्यासपीठावरून मुस्लिमांना देशाच्या विकासात समाविष्ट करून घेण्याचा नारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी ३५० खासदारांचे लक्ष ठेवले असले तरी त्याला कितपत यश येणार काळच ठरवेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 11:24 IST