Pratiyuti Drishti Yog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाची स्वतःची विशेष भूमिका मानली जाते. शुक्राला सुख, प्रेम, धन, ऐश्वर्य आणि भौतिक सुख-सुविधांचा कारक ग्रह मानलं जातं, तर शनी हा कर्म, न्याय, शिस्त आणि मेहनतीचा कारक ग्रह आहे. आता हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोर येणार असून प्रतियुति दृष्टि योग तयार होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी शुक्र आणि शनी एकमेकांपासून १८० अंशांवर येतील. या स्थितीमुळे प्रतियुति दृष्टि योग तयार होईल. या योगाचा प्रभाव काही तासांपासून काही दिवसांपर्यंत जाणवू शकतो. या योगामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक स्थिती मजबूत होणे, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात फायदा आणि अडकलेली कामं मार्गी लागण्याचे संकेत मिळू शकतात. तर मग जाणून घेऊया, या शुभ योगाचा फायदा कोणत्या ४ राशींना होऊ शकतो.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी प्रतियुति दृष्टि योग फायदेशीर ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा जबाबदारीत वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा मार्ग मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.
कर्क राशी
कर्क राशीसाठी शुक्र-शनीचा हा योग आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी किंवा मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी प्रतियुति दृष्टि योग उत्पन्नाचे नवे मार्ग खुलवणारा ठरू शकतो. विशेषतः भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ झाल्यास एखादी मोठी आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातही सकारात्मक बदल दिसू शकतात. नात्यातील मतभेद कमी होऊन परस्परांमधील विश्वास वाढू शकतो.
मीन राशी
मीन राशीसाठी हा योग प्रेम, पैसा आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ विशेष आनंददायी ठरू शकतो. जीवनसाथीसोबतचं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.
