Rahu And Budha In Trikone 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर आपली चाल बदलतो, रास बदलतो. त्याचा शुभ-अशुभ परिणाम सर्व राशींवर होतो. त्यात आता ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह; जो वाणी, तर्क-वितर्क, सुरक्षा, संवाद इत्यादींचा कारक मानला जातो. विशिष्ट कालावधीनंतर बुध ग्रहदेखील आपली राशी बदलतो. त्यात ५ ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीमध्ये वक्री होणार आहे. बुध ज्या राशीत वक्री होतो, तेव्हा त्या राशीच्या मागच्या राशीवरदेखील त्याचा परिणाम होतो. अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात फरक पडेल. त्यानंतर २२ ऑगस्टला बुध कर्क राशीत प्रवेश करील. अशा स्थितीत ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात बुधाचा कर्क राशीवर प्रभाव पडेल. अशा स्थितीत राहू त्रिकोणात असेल. बुध आणि राहू यांच्यात मैत्रीची भावना आहे. जेव्हा बुध वक्री होतो, तेव्हा लोक अधिक शक्तिशाली होतात. अशा स्थितीत बुधाबरोबर राहूही सक्रिय झाला आहे. बुध आणि राहू त्रिकोणी संयोगामुळे कोणत्या राशींचे भाग्य चमकू शकते ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह

राहू – बुध त्रिकोणी स्थिती येत असल्याने सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. त्यांना आर्थिकदृष्ट्यादेखील खूप फायदा होऊ शकतो. जी समस्या तुम्हाला खूप दिवसांपासून सतावत होती, आता तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू शकता. तुमच्या वाणीचा अधिक प्रभाव पडेल. तुमचे लक्ष पूर्णपणे पैसे कमवण्यावर असेल. अशा स्थितीत तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. अनावश्यक खर्चापासून दूर राहाल. त्याचबरोबर तुम्ही गुंतवणूकही करू शकता. निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढण्याची शक्यता आहे; ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याचा लाभ मिळेल. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात फक्त आनंदच येणार आहे. या कालावधीत मोठ्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी होऊ शकते. ऑनलाFन बिझनेस करणाऱ्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे.

Read More Astrology Related News : Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन १८ की १९ ऑगस्टला? नक्की तारीख काय? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? घ्या जाणून…

कर्क

बुध आणि राहू यांच्यातील त्रिकोणी संबंधांचा कर्क राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. राहु भाग्यस्थानात असल्यामुळे तुम्हाला लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. त्यामुळे तुम्ही भरपूर कमाई करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या बोलण्याच्या शक्तीच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबीय, मित्रांना किंवा जोडीदाराला जे सांगायचे आहे ते तुम्ही व्यक्त करू शकाल, आता यावेळी तुम्ही तुमचे मत उघडपणे मांडू शकाल. भाऊ, बहिणी आणि वडील यांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनेक क्षेत्रांतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेश व्यापारातूनही तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.

तूळ

बुध आणि राहूच्या स्थितीमुळे तूळ राशीच्या लोकांना परदेशातून भरपूर लाभ मिळू शकतात. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नशीब पूर्ण साथ देईल. तुम्ही तुमच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळेल. तुमची कारकीर्द नवीन उंचीवर जाईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्याच्या मदतीने तुम्ही आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात कराल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तुमचे पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारी प्रकल्पातही फायदा होईल. कला क्षेत्राशी निगडित लोकांना आर्थिक लाभासोबत सरकारकडून मान-सन्मान मिळू शकतो.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu and budha trikone budha vakri 2024 these zodiac sign will lucky get money and wealth sjr
Show comments