Rahu Chandra Yuti Grahan Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचाली आणि युतीचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. जेव्हा कधी एखादा अशुभ योग तयार होतो, तेव्हा त्याचे परिणाम देश आणि जगासह सर्व १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चढ-उतारांच्या रूपात दिसून येतात. पंचांग आणि ग्रहांच्या गोचरानुसार, ३१ जुलै २०२६ ते २ ऑगस्ट २०२६पर्यंतचे पुढील तीन दिवस अत्यंत संवेदनशील असतील. या काळात आकाशात राहू आणि चंद्राची युती होऊन एक धोकादायक ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे काही विशिष्ट राशींसाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

राहू-चंद्र ग्रहण म्हणजे काय?

चंद्र आणि राहू एकाच घरात युती करतात, तेव्हा ग्रहण योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मन आणि भावनांचा घटक मानला जातो, तर राहू हा एक मायावी आणि छाया ग्रह मानला जातो. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा मानसिक ताण, निर्णय घेण्यास असमर्थता, आर्थिक मुकसान आणि अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. ही युती पुढील तीन दिवसांसाठी काही विशिष्ट राशींच्या लोकांसाठी मानसिक आणि शारीरिक आव्हाने वाढवू शकते.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींनी पुढील तीन दिवस अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राहूचा प्रभाव आणि चंद्रग्रहणामुळे तुमच्या चालू कामात अडथळा येऊ शकतो. आर्थिक बाबींमध्ये कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळा, कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांना सहकारी किंवा भागीदारांशी मतभेदांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक अस्वस्थता आणि किरकोळ आरोग्य समस्या देखील तुम्हाला सतावू शकतात.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी हे तीन दिवस तणावपूर्ण ठरू शकत्तात. या काळात आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर तुम्ही मोठ्या वादात अडकू शकता. कौटुंबिक जीवनात मतभेद किंवा गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या काळात सावधगिरी बाळगावी. राहू आणि चंद्राच्या युतीमुळे तुमचा खर्च अचानक मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.त्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. छुप्या शत्रूंपासून सावध राहा. कोणत्याही कागदपत्रांवर सह करण्यापूर्वी अधिक सावधगिरी बाळगा.