Shravan Rahu Nakshatra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह राशी किंवा नक्षत्र बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या जीवनावर होतो. सध्या राहू स्वत:च्या शतभिषा नक्षत्रात भ्रमण करत आहे. पण २ ऑगस्ट २०२६ पासून राहू धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. श्रावण महिन्यात राहूचा धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना राहू नक्षत्र गोचर फलदायी ठरेल.

मेष

राहूचे नक्षत्र गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. उत्पन्न आणि सुखसोयींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

सिंह राशीसाठी राहूचे हे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे, तुम्ही उसणे दिलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात. एखाद्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जुन्या कर्जांतून दिलासा मिळेल.

सिंह

सिंह राशीतील राहूचे गोचर सकारात्मक दिसत आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता असेल. व्यावसायिकांसाठी एक मोठा करार अचानक निश्चित होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती खूपच मजबूत असेल. पगारवाढीची शक्यता आहे. तुम्हाला वाहनाचे किंवा घराचे सुख मिळू शकते.

धनु

धनु राशीच्या लोकांना राहूच्या गोचरामुळे मोठे फायदे मिळताना दिसतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सुटू शकते. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती आता मिळू शकते. या काळात व्यावसायिकही भरपूर पैसे कमावण्यात यशस्वी होतील. कामासाठी केलेला प्रवास सुखद ठरेल.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)